मुंबई, दि.14 : केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या विचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरिता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
नागरिकांची मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार करण्यात येणार आहे. तरी याबाबत नागरिकांनी dycommr.enf1@gmail.com या ई-मेलवर दिनांक २० मे २०२३ पर्यंत अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन राज्याच्या परिवहन आयुक्त यांनी केले आहे.
याविषयी अधिक माहितीसाठी कैलास कोठावदे, सहाय्यक परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. (मो. ९५५२८८३९३०/ ई-मेल- dycommr.enf1@gmail.com) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याची लिंक https://morth.nic.in/sites/default/files/notificationsdocument/Motor%20Vehicle%20Aggregators27112020150046.pdf
हे ही वाचा :
अकोल्यात 2 गटात हिंसक हाणामारी, कलम 144 लागू
ब्रेकिंग : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची कुस्ती महासंघ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी !
कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ
Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन
“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे