Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकर्नाटकच्या जनतेने अच्छे दिनाचे मार्केटिंग संपुष्टात आणले – आप

कर्नाटकच्या जनतेने अच्छे दिनाचे मार्केटिंग संपुष्टात आणले – आप

महागाई, भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेचा कौल – आप

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : कर्नाटकच्या जनतेने अच्छे दिनाचे मार्केटिंग संपुष्टात आणले आहे. महागाई, भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेचा कौल आहे, असे प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे कार्यकारी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली.

बेंद्रे म्हणाले, अच्छे दिन, सबका साथ सबका विकास अशा लोकप्रिय घोषणांचा प्रचार पेड मेडिया मार्फत लोकांच्या माथी मारून मोदी सरकारने सहज सत्ता मिळवली, अंधभक्तांची फौज विरोधी पक्षाच्या बदनामीसाठी वापरून देशभर मोदी हे तारणहार आहेत. देशाचा खरा विकास २०१४ पासून विश्वगुरूच्या नेतृत्वाखाली होत असल्याचा आभास निर्माण करण्यात भाजपची आय टी सेल यशस्वी झाली होती. सत्ता पिपासू भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे ऑपरेशन लोटसच्या नावाखाली अस्थिर केली त्यामुळे संघराज्य व्यवस्थेला धक्का बसून ती राज्ये आर्थिक राजकीय दृष्ट्या अस्थिर झाली. जीएसटी आणि इंधन दरवाढीच्या लुटीतून अदानी अंबानी यांच्या विकास केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलन क्रूरपणे चिरडण्याचा प्रयत्न केला. कामगार कायदे बदलून ३० कोटीहून जास्त संघटित कामगारांचे संघटना हक्क नष्ट केले. ४२ कोटीहून जास्त असंघटित कामगारांच्या किमान वेतनामध्ये २ टक्के पण वाढ केली नाही मात्र महागाई चौपटीने वाढवली. कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या सर्व केंद्रीय योजनांमध्ये २०१४ पासून सतत कपात केली खते,बी बियाणी यावरील सर्व सवलती कमी करून ११लाख कोटी सबसिडी मित्र उद्योगपतींना दिल्या.सर्व कल्याणकारी योजना बंद करून सामान्य जनतेचे जीवन बेहाल केले.

कर्नाटकातील निवडणुकीचे निकाल मोदींच्या फसव्या मार्केटिंगचे तीन तेरा वाजवणारे आहेत. कर्नाटक विधानसभा प्रचाराचे वेळीही त्यांनी वाढत्या इंधन किमती, अन्नधान्य जीवनावश्यक ईई ची महागाई व बेरोजगारी याबद्दल कोणतेही भाष्य न करता धार्मिक द्वेष आधारित द्वेषमूलक प्रचार करत सत्ता मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भाजपला पुन्हा सत्तेवरून नाकारून कर्नाटकच्या जनतेने धर्मनिरपेक्ष, कल्याणकारी आकांक्षा पूर्ततेसाठी बहुमत दिले आहे, असेही बेंद्रे म्हणाले.

हे ही वाचा :

अकोल्यात 2 गटात हिंसक हाणामारी, कलम 144 लागू

ब्रेकिंग : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची कुस्ती महासंघ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी !

कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’

“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय