Wednesday, May 1, 2024
Homeग्रामीणसामान्य जनतेचे पीठ महाग केल्यामुळे भविष्यात भारत भाजप मुक्त होईल ! –...

सामान्य जनतेचे पीठ महाग केल्यामुळे भविष्यात भारत भाजप मुक्त होईल ! – कॉ. गणेश दराडे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : कर्नाटकमधील निकाल भाजपच्या कार्पोरेट धार्जिण्या व द्वेष मूलक राजवटीला जनतेने दिलेली चपराक आहे. दक्षिण भारतातील जनतेने अच्छे दिन, सबका साथ, सबका विकास अशी प्रतिमा आयटी सेल, अदानी अंबानी यांच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया देशभरातील पेड मीडियाने नरेंद्र मोदी यांची बनवली होती. मात्र २०१४ पासून कामगार, शेतकरी सर्वसामान्य जनता यांच्या कल्याणकारी योजनांना कात्री लावणारे अर्थकारण मोदी सरकारने सुरू केले. त्यामुळे सामान्य जनतेचे पीठ महाग केल्यामुळे कर्नाटकात भाजपचा पराभव झाला आहे, असे विश्लेषण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहर समितीच्या प्रसिद्धीपत्रकात विशद केली आहे.

पुणे जिल्हा सचिव कॉ. गणेश दराडे यांनी म्हटले आहे की, देशातील जनता विभूतीपूजक आहे, त्यामुळे मोदी शहा ही जोडगोळी रामराज्य आणेल हा विश्वास लोकांमध्ये मध्ये निर्माण झाला होता. मात्र 2019 पासून अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल, गहू, ज्वारी ई जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड दरवाढ करण्यात आली. २०२० ते २०२१ च्या कोरोना काळात देशातील श्रमिक वर्ग भुके कंगाल होऊन निर्वासितासारखा पायी चालत गावाकडे परतत होता. असंघटित श्रामिकांच्या नोकऱ्या गेल्या. मोफत गॅसच्या उज्वला योजना फोल ठरल्या, ग्रामीण भागात माताभगिनी चुलीवर भाकर भाजू लागल्या. ११ हजार कोटीच्या आर्थिक सवलती अदानी अंबानी सह इतर कार्पोरेटला देण्यात आल्या. मनमोहन सिंग सरकारच्या काळात इंधनाचे दर ८५ रु गॅसचे दर ५५ रु वाढल्यावर देशभर आक्रमक आंदोलने करणाऱ्या मोदी सरकारने महाप्रचंड इंधन दरवाढ करून घरगुती गॅस किमती ११०० रु पर्यंत वाढवून सामान्य जनतेचा खिसा रिकामा केला, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हटले कि, या देशात धार्मिक विद्वेष निर्माण करून राज्य करता येत नाही, कोणतीही हुकूमशाही राजवट जनता सहन करत नाही. इंदिरा गांधी यांच्या एकतंत्री राजवटीला जनतेने इतिहास जमा केले होते. राजीव गांधी यांना ४०१ इतके प्रचंड बहुमत देणाऱ्या जनतेने काँग्रेसला पण त्यांची जागा दाखवून दिली होती. मोठ्या अपेक्षेने २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांना ३०० हुन जास्त जागा मोठ्या अपेक्षेने मिळवून दिल्या होत्या. मात्र आपले पीठ महाग झाले आहे, पूर्वी होते ते दिवस बरे होते, असे आता जनतेला वाटू लागले आहे. मोदींच्या या दुसऱ्या टर्म मध्ये आपले सुखाचे दोन घास शिल्लक राहावेत व अशा प्रकारचे कार्पोरेट उद्योगपतींना अच्छे दिन आणणाऱ्या मोदी सरकारने कर्नाटकच्या जनतेने नाकारले आहे.

देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनतेसाठी कॉमन मिनिमम कार्यक्रम हाती घेऊन मोदी सरकार हटवण्यासाठी जनआंदोलन करावे, असे आवाहन ‘माकप’च्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे. या पत्रकावर सतीश नायर, सचिन देसाई, अपर्णा दराडे, डॉ.किशोर खिलारे, डॉ.ज्ञानेश्वर मोठे, डॉ महारुद्र डाके, अँड नाथा शिंगाडे, डॉ.अमोल वाघमारे, सरस्वती भांदीर्गे, सोमनाथ निर्मळ, एस के पोन्नपन यांच्या सह्या या पत्रकावर आहेत.

हे ही वाचा :

अकोल्यात 2 गटात हिंसक हाणामारी, कलम 144 लागू

ब्रेकिंग : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची कुस्ती महासंघ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी !

कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’

“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय