Sunday, May 19, 2024
Homeजिल्हालाचखोर पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले; पोलिस दलात खळबळ

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले; पोलिस दलात खळबळ

नाशिक : नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. कायद्याचा रक्षक असलेल्या पोलिस उपनिरीक्षकानेच विनयभंगातील गुन्ह्यात लाच स्वीकारल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, नाशिकरोड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक गणपत महादू काकड, (57, रा. कृष्ण अपारर्टमेंट, गजपंथ अपार्टमेंट, दिंडोरी रोड म्हसरूळ) याला विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयिताकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

एका पति, पत्नी परस्पर विरोधी तक्रार होती म्हणून, नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील फिर्यादीने विनयभंगाचा आरोप केला होता. त्या गुन्ह्यातील तपासादरम्यान आरोपीताला मदत करण्यासाठी गणपत काकड याने त्याच्याकडे बुधवारी (दि.5) 25 हजाराची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती 15 हजारांची रक्कम देण्याचे ठरले. मात्र या गुन्ह्यातील आरोपीने त्याला खोट्या गुन्ह्यात गोवले जात असून अशा प्रकारातही त्याच्याकडून 15 हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या पथकाने या प्रकाराची खात्री केली. शुक्रवारी सकाळी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, तक्रारदाराकडून 15 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या नेतृत्वातील पोलिस हवालदार बाविस्कर, पोलिस नाईक प्रकाश महाजन, ज्योती शार्दूल यांच्या पथकाने गणपत काकड याला रंगेहाथ पकडले आहे.

दरम्यान, या प्रकरणात एका पोलिस हवालदरानेही काकड यांची मदत केली असून त्यालाही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात रात्री उशीरापर्यंत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल, अध्यक्षपदी “या” नेत्याची केली निवड

उध्दव ठाकरेंना धक्का; दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार

आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय