Sunday, May 19, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद, म्हणाल्या...

ब्रेकिंग : काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद, म्हणाल्या…

मुंबई : राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयाला आली आहेत. राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत आला आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्यासोबत अन्य ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या राजकीय घडामोडी घडत असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे. यावरून पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावलल जात असल्याच्या चर्चा आहेत. त्या नाराज असल्याचेही सातत्याने बोलले जात आहे. अशात आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाल्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. यातच पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू असल्याने पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी कोणत्याही पक्षाशी किंवा नेत्याशी चर्चा केलेली नाही, राहुल गांधींना मी आयुष्यात कधीही भेटलेली नाही. सोनिया गांधी यांना मी कधीही भेटलेली नाही. पक्षाचा आदेश मी कायमच अंतिम मानला. मला पक्षाने अनेकदा डावललं तरी मी नाराजी व्यक्त केली नाही. लपुनछपुन काम करणाऱ्यांचा कंटाळा आलाय. मला कोणता निर्णय घ्याचया असल्यास मी डंके की चोट पे घेणार असेही त्या म्हणाल्या.

या सोबतच त्या म्हणाल्या, मी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची बातमी एका प्रसार माध्यमाने दिली. त्या माध्यमा विरोधात मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे, माझं करिअर हे कवडीमोल नाही असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, भाजप फुटेल असा दिवस येऊ नये म्हणत २० वर्ष काम केले आता या सगळ्या चर्चांमधून अलिप्त राहण्यासाठी २ महिने सुट्टी घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार

आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय