Tuesday, May 14, 2024
Homeजिल्हादुचाकी परत करण्यासाठी मागितली लाच; पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल एसीबीच्या जाळ्यात

दुचाकी परत करण्यासाठी मागितली लाच; पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल एसीबीच्या जाळ्यात

वाशीम : वाशिमच्या जऊळका पोलीस स्टेशमध्ये गुन्ह्यात दुचाकी जप्‍त केली होती. सदरची जप्त केलेली दुचाकी संबंधीतास परत करण्यासाठी पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल शफीक खान यांनी २ हजार रूपयांची मागणी केली होती. दरम्यान तडजोडी अंती १ हजार ३०० रूपये ठरले होते. मात्र याबाबत तक्रारदाराने गुपचूप वाशिमच्‍या लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.

त्यामुळे वाशिम लाचलुचपत विभागाकडे प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करून पथकाने सापळा रचला. यानंतर पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल खानने तेराशे रूपये तक्रारदाराकडून स्‍वीकारताच पथकाने लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधिक्षक देविदास घेवारे, अॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती, यांचे मार्गदर्शनात व पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधिक्षक गजानन आर शेळके, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम यांचे सह तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एस.यु. कांबळे यांचे पथकातील कर्मचारी पोहवा राहुल व्यवहारे, पोना योगेश खोटे यांनी केली.

शासकिय लोकसेवकाने, खाजगी इसमाने शासकिय काम करुन देण्यासाठी व करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, वाशिम दुरध्वनी क्रमांक ०७२५२ / २३५९३३ टोल फ्रि.नं. १०६४ मोबाईल क्रमांक ९९२२२४३४३८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन एस.यु. कांबळे पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, वाशिम यांनी केले आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल, अध्यक्षपदी “या” नेत्याची केली निवड

उध्दव ठाकरेंना धक्का; दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार

आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय