Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याUttarakhand: उत्तराखंडमध्ये जंगलात भीषण वणव्यामुळे शेकडो झाडे खाक

Uttarakhand: उत्तराखंडमध्ये जंगलात भीषण वणव्यामुळे शेकडो झाडे खाक

Uttarakhand : उष्मा वाढत असतानाच गेल्या सहा दिवसांपासून उत्तराखंडमधील नैनिताल येथील जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे.

भारतीय हवाई दलाच्या मदतीने वन विभागाचे कर्मचारी, अग्नीशमन दल, पोलीस आणि सैनिकही प्रयत्न करत आहेत. वायूदलाच्या ‘एम्.आय.-१७’ हेलिकॉप्टर्समधून पाण्याची फवारणीही केली जात आहे. अनेक भागांमधील वणव्यामुळे आसपासच्या नागरी वसाहतीमध्ये धूर पसरला आहे. या वणव्यांमुळे आतापर्यंत 33.34 हेक्टरवरील झाडे जळून खाक झाली आहेत.

आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारे, घनदाट हिरव्या जंगली प्रसिद्ध पर्वत असलेल्या राज्यामध्ये ही आपत्ती निर्माण झाली आहे. या आगीमुळे (forest fire) वनस्पती आणि जंगल जीव सृष्टीचर जीवांना संकटात टाकले आहे. या वर्षी उष्णता वाढल्याने जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहे.असे सूत्रांनी सांगितले. Uttarakhand news

नैनिताल, हल्दवानी आणि रामनगर या गावांच्या लगतच्या जंगलांमध्ये वणव्यांचे स्वरूप तीव्र होते. त्यामुळे प्रशासनाने लगतच्या गावात सतर्कतेचा इशारा दिला.

हवाई दल (Indian Air force) आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी याच भागावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. शनिवारपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आज आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरीही काही भागांमध्ये अद्याप वणवे धुमसत आहेत. नरेंद्रनगर वनविभागा अंतर्गत येणाऱ्या माणिकनाथ डोंगररांगेत पेटलेले वणवे पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आले आहेत, असे वनखात्याने म्हटले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त

SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !

मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा

संबंधित लेख

लोकप्रिय