Friday, May 10, 2024
Homeराष्ट्रीयBreaking : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भल्या पहाटे अटक

Breaking : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भल्या पहाटे अटक

विजयवाडा : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे झोपेत असताना पोलिसांनी अटक केली आहे. (Breaking News) चंद्राबाबू नायडू यांना 350 कोटी रुपयांच्या एपी स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमधील घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. Former Chief Minister of Andhra Pradesh Chandrababu Naidu was arrested early in the morning

ईडीच्या तपासात हा घोटाळा सिद्ध झाला आहे. 241 कोटी रुपयांचा निधी शेल कंपन्यांना पाठवण्यात आला होता. याप्रकरणी 8 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

नंद्याल रेंजचे डीआयजी रघुरामी रेड्डी आणि गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचा मोठा ताफा पहाटे 3 च्या सुमारास शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये पोहचला. मात्र, त्याठिकाणी उपस्थित टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना तीव्र प्रतिकार केला. त्यांनी पहाटे 5.30 वाजेपर्यंत कोणालाही नायडूंपर्यंत पोहोचू दिलं नाही. शेवटी, सकाळी 6 च्या सुमारास, पोलिसांनी नायडू घराचे दरवाजे ठोठावले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय