Friday, May 10, 2024
Homeजिल्हाKhed : खेड मधील गुणवंत मान्यवरांचा सत्कार

Khed : खेड मधील गुणवंत मान्यवरांचा सत्कार

आळंदी / अर्जुन मेदनकर : खेड तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धी पुणे जिल्हा, खेड तालुका, आळंदी शहर समिती तर्फे समितीचे कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा संघटक आमच्या सर्वांचे सहकारी मित्र आर.टी.आय. कार्यकर्ते पै. बाळासाहेब चौधरी यांचे विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार व सन्मान समितीच्या वतीने करण्यात आला. Honoring the meritorious dignitaries in Khed

तसेच खेड तालुक्यातील आदर्श वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांना त्यांचे आरोग्य क्षेत्रात केलेल्या आरोग्यदायी भरीव लक्षवेधी कार्याबद्दल सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. 

उत्कृष्ठ आरोग्य सेवा दिल्या बद्दल त्यांचा आळंदी शहर समिती, खेड तालुका व पुणे जिल्हा समितीचे वतीने जिल्हा अध्यक्ष सुरेश टाकळकर यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आहे.

या प्रसंगी खेड तालुका अध्यक्ष प्रकाश पाचारणे, पुणे जिल्हा संघटक पै. बाळासाहेब चौधरीं, आळंदी शहर समिती अध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, पत्रकार महादेव पाखरे, अविनाश राळे, सचिन शिंदे, सचिव सतीश चांभारे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय