Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडRain : महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचे धुमशान ; राज्यातील बळीराजा खुश

Rain : महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचे धुमशान ; राज्यातील बळीराजा खुश

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : संपूर्ण महाराष्ट्रात तुफान पाऊस पडत असल्यामुळे राज्यातील बळीराजा खुश झाला आहे. गेले 28 दिवस पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसाने मराठवाड्यातील 11 जलाशय पूर्ण भरले आहेत. राज्याच्या प्रमुख 22 जिल्ह्यात पावसाने कृपा केली आहे. पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाने उजनी जलाशय ओसंडून वहात आहे. Heavy rain everywhere in Maharashtra

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जारी केला आहे. IMD नुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील 22 जिल्ह्यांच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि बीड जिल्ह्यात पावसाची सुरवात झाली आहे. कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पश्चिम घाट क्षेत्रात सुमारे 25 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असून, कोयना धरणाच्या पाणलोटात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. तर, अन्यत्र, पावसाची रिपरिप दिसते आहे.शुक्रवारी दिवसभरात कोयना धरणक्षेत्रातील पाथरपुंजला सर्वाधिक 105 मि. मी. तर नवजाला 103, प्रतापगडला 84, महाबळेश्वरला 71 मि. मि. पाऊस झाला आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, चिपळूण, रत्नागिरी, मालवण, नाशिक या प्रमुख शहरात जोरदार पाऊस सुरू आहे.

राज्यात 9, 10 आणि 11 तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचे आगमन होत आहे. पश्चिम घाट, मावळ, मुळशी, पुणे जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ आणि आल्हाददायक हवामान पसरले आहे. राज्यातील एकूण 13 जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

तब्बल महिनाभराच्या खंडानंतर रिमझिम पाऊस होत असल्याने खरीप पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. गुरुवारी व शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली.  मराठवाडा विदर्भ येथे पाऊस सुरू झाल्यामुळे मूग, उडीद, डाळी, कडधान्ये या पिकांना जीवदान मिळाले आहे.

मराठवाड्यातील सिंचनासाठी उपयुक्त 11 जलसाठ्यात वाढ होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल असा शेतकऱ्यांना विश्वास आहे. तर या पावसामुळे कोकणातील भातपिकाना बरकत येणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय