Sunday, April 28, 2024
Homeग्रामीणविधी महाविद्यालयातील ९०% विद्यार्थी नापास; चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

विधी महाविद्यालयातील ९०% विद्यार्थी नापास; चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

मालेगाव(प्रतिनिधी):- येथील कर्मवीर भाऊसाहेब विधी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच प्रथम व द्वितीय सत्राचा निकाल लागला. त्यात ९०% विद्यार्थी नापास केले आहेत. अंतर्गत मूल्यमापन तसेच सेमिस्टर परीक्षा (INTERNAL & EXTERNAL) मध्ये दिलेल्या गुणांना विद्यार्थ्यांनी हरकत घेतली आहे, मूल्यांकन चूकीच्या पध्दतीने केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

         विद्यार्थ्यांची विनंती केली आहे की मिळालेल्या गुणाचे पुनरमूल्याकंन व्हावे, विद्यापीठामार्फत पेपरची फेर तपासणी करण्यात यावी. कोविड-१९ च्या प्रभावा मुळे शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार  विधी अभ्यासक्रम (LLB ) च्या पहिल्या वर्षाच्या प्रथम सेमिस्टर च्या ५०% व दुसऱ्या सत्राच्या अंतर्गत मूल्यमापन यांची सरासरी घेऊन दुसऱ्या सेमिस्टरला देण्यात यावे, असे आदेश असताना कॉलेजने विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणही समाधानकारक दिले नाहीत. 

            कोरोनासारख्या आपत्ती काळात आधीच विद्यार्थी खूप संकटात आणि नैराश्यात सापडले आहेत. त्यात अशी अनियमितता झाल्यामुळं विद्यार्थी अजून संकटात सापडले आहेत.

           या अनुषंगाने उत्तरपत्रिकाची फोटोकॉपी तसेच पुर्नमूल्यांकन करून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंत निवेदनाद्वारे प्राचार्य, कुलगुरु तसेच शिक्षण मंत्र्यांकडे विद्यार्थ्यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय