Saturday, April 27, 2024
Homeग्रामीणशहापूर तालुक्यातील या आदिवासी पाड्यात 'अन्न व रोजगार मागणी दिन' चे आंदोलन.

शहापूर तालुक्यातील या आदिवासी पाड्यात ‘अन्न व रोजगार मागणी दिन’ चे आंदोलन.

शहापूर(प्रतिनिधी):- लॉकडाऊन परिस्थिती असताना लाखो कष्टकरी, वंचित समूह संकटात आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने देशभर अन्न व रोजगार देण्याची, तसेच हिंसाचार त्वरित थांबवण्याची मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर  तालुक्यातील चक्कीचा पाडा गावात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जमसंच्या राज्य कमिटी सदस्य सुनीता ओझरे यांनी केले.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :-


१. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आयकर न भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात सरकारने दरमहा ७,५०० रुपये टाकावेत.

 

२. सर्व गरजूंना पुढील किमान ६ महिन्यांपर्यंत १० किलो धान्य मोफत द्या.

 

३. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तू मोफत द्या.

४. मागणी करणाऱ्या प्रत्येकाला मनरेगामार्फत २०० दिवस काम द्या.

५. नगर पंचायत भागांतही मनरेगा सुरू करा.

६. शहरी बेरोजगारांकरता रोजगार हमी योजना त्वरित सुरू करा.

 

७. कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांना उपचार त्वरित द्या.

 

८. अनैच्छिक गर्भधारणा रोखण्यासाठी मोफत गर्भनिरोधके पुरवठा करा.

९. सीएए-एनआरसी-एनपीए विरोधात भूमिका घेणाऱ्यांना आकसाने अटक करणे त्वरित थांबवा. तसेच अटकेत असलेल्यांची त्वरित सुटका करा.

१०. हिंसाचाराला बळी पडलेल्यांना, विशेषतः महिलांना सुरक्षा द्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय