Friday, November 22, 2024
Homeजिल्हाDYFI तर्फे शहीद राजगुरू यांच्या जयंतीदिनी 'बाईक रॅली'

DYFI तर्फे शहीद राजगुरू यांच्या जयंतीदिनी ‘बाईक रॅली’

खेड : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शहीद राजगुरू यांच्या जयंतीदिनी बाईक रॅली काढण्यात आली. शहीद राजगुरू अमर रहे” या घोषणानी गजबजुन डी. वाय. एफ. आय. तर्फे निगडी ते राजगुरुनगर बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले. (‘Bike Rally’ by DYFI on the birth anniversary of Shaheed Rajguru)

हि रॅली दत्तवाडी येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून निघाली. राजगुरुनगर शहरातील शहीद राजगुरू, शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅली शहीद राजगुरू यांचे रहिवासी स्थान राजगुरूवाडा येथे थांबली. 

शहीद राजगुरू यांचे विचार अंगिकारणे व विचार प्रसार करणे हि आजच्या काळाची गरज साधुन शहीद राजगुरू यांच्या पुतळ्याला हार घालून बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी बोलताना डी.वाय.एफ.आय.चे पुणे जिल्हा सचिव सचिन देसाई म्हणाले, शहिदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी युवकांनी त्यांचा विचार समाजापर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. तसेच आपण यावेळी युवकांना मोठ्या संख्येने समाजपरिवर्तनाच्या चळवळीत सहभागी करून घेऊयात असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव नवनाथ मोरे म्हणाले, शहीदांना अभिवादन करत असताना आजही समाज दु:ख, दारिद्र्य, शोषण यांनी ग्रासला आहे. असे असताना आपले कर्तव्य आहे की शहीदांना अपेक्षित असलेला समाजवादी भारत घडविण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. त्या बदलासाठी आंदोलन, मोर्चा, प्रबोधन या माध्यमातून आपण लढावे लागेल.

यावेळी किसान सभेचे खेड तालुका सचिव अमोद गरूड, डी.वाय.एफ.आय.चे पिंपरी चिंचवड चे सचिव अमिन शेख, देविदास जाधव, शिवराज अवलोल, आदर्श पांडे, सौरभ चौहान, पंकज जैसवार, कार्तिक सोलंकी, साद भालदार, प्रथम शेट्टी उपस्थित होते.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती  

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज   

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती  

ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 991 पदांची भरती, ऑनलाईन करा अर्ज 

ZP : कोल्हापुर जिल्हा परिषद अंतर्गत 728 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज ! 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती

birth anniversary of Shaheed Rajguru
birth anniversary of Shaheed Rajguru
संबंधित लेख

लोकप्रिय