Wednesday, February 19, 2025

कामगार संघटनांचा दोन दिवसीय देशव्यापी संप, संपात बँकाही होणार सहभागी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांनी २८ आणि २९ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या भारत बंद आणि संपात सहभागी होण्याचा निर्णय बँक संघटनांनी घेतला आहे. 

केंद्राच्या या धोरणांविरोधात केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचानं चर्चेसाठी २२ मार्च रोजी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत २८ आणि २९ मार्च रोजी संप पुकारण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला आहे. या संपामुळं बँकिंग, ट्रान्सपोर्ट यांसह विविध सेवांवर यामुळं परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारची धोरणे कर्मचारीविरोधी असल्याचे सांगत जॉइंट फोरम ऑफ सेंट्रल ट्रेड युनियन्सने सोमवार आणि मंगळवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात बँक संघटनांही सहभागी होणार आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने या संपाला पाठिंबा दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण आणि बँकिंग कायदा २०२१ च्या विरोधात ते आंदोलन करणार आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles