Wednesday, October 23, 2024
Homeहवामानसावधान ! राज्यातील "या" जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

सावधान ! राज्यातील “या” जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

 

पुणे :   राज्यात सध्या उन्हाचा तडाखा पहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेनं शरिराची लाही लाही होत आहे. उन्हानं आता सर्वांच्या अडचणीत भर टाकायला सुरूवात केली आहे. सर्वत्र सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !

विमान अपघातात 132 जणांचा मृत्यू, डीएनए चाचणीद्वारे 120 मृतांची ओळख पटली

येत्या तीन दिवसांत पश्चिम हिमालयातील काही भागासह गुजरातमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

पूढील चार ते पाच दिवसात पश्चिम मध्यप्रदेश, विदर्भ आणि राजस्थानात उन्हाचा चटका वाढणार आहे. 29 ते 31 मार्च दरम्यान महिन्याच्या शेवटी दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णता भडकण्याची शक्यता आहे. 

29 ते 31 मार्चमधे अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेची लाट धडकणार आहे, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसच्या पुढ पारा गेला आहे. येत्या काही दिवस तरी उष्णतेत अशीच झपाट्यानं वाढ होणार आहे.

कामगार संघटनांचा दोन दिवसीय देशव्यापी संप, संपात बँकाही होणार सहभागी

व्हिडिओ : ओला इलेक्ट्रिक स्कूटरला भररस्त्यात आग

संबंधित लेख

लोकप्रिय