Saturday, October 5, 2024
HomeहवामानLatur : मराठवाड्यात पावसाचे धुमशान, 314 मिलिमीटर पावसाची नोंद

Latur : मराठवाड्यात पावसाचे धुमशान, 314 मिलिमीटर पावसाची नोंद

लातूर : आंध्र आणि तेलंगणा नंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार मुसंडी मारलेली आहे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून दोन दिवस पाऊस सुरू राहील, मराठवाड्यातील हदगाव, भोकर, किनवट, माहूर, व हिमायतनगर तालुक्यांसह 284 महसूल विभागात 65 मिलिमीटर ते 217 मिलिमीटर इतका पाऊस पडल्यामुळे सर्वत्र शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. काही तालुक्यात 314 मिमी पाऊस पडून मोठी ढगफुटी झाली आहे. (Latur)

मराठवाड्यातील एकूण 63 गावांमध्ये सर्वात जास्त घरादारांचे नुकसान झालेले आहे आणि शेती पण वाहून गेलेली आहे.

एक ऑगस्ट च्या महसुली रिपोर्टनुसार एकूण चार लोक मृत्यू पावले असून 88 जनावरे वाहून गेलेली आहेत. 29 पक्की घरे आणि ९८ कच्ची घरे नुकसानग्रस्त झालेलीआहेत.

हिंगोली आणि शेगाव यांना जोडणारा मोठा पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झालेले आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर या पिकांना फटका बसला असून हळद, केळी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबताच नुकसानीचे पंचनामे होतील, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्पष्ट केले. (Latur)

धाराशिव जिल्ह्यातील काही नद्यांना पूर आला, तर कळंब तालुक्यातून वाहणारी तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे दहिफळ आणि परतापूर या दोन गावांचा संपर्क तुटला.

यावर्षी मराठवाड्याला बऱ्यापैकी पावसाने झोडपलेलेच आहे, मात्र मागील तीन आठवडे कोरडा असलेल्या मराठवाडा विभागाला रविवारी आणि सोमवारी पावसाने चांगलेच झोडपले आहे.

धाराशिव, लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये सर्वत्र तुफान पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठवाड्याच्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने महसूल विभागाला तातडीने आदेश दिलेले आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय