Tuesday, September 17, 2024
Homeराज्यबैलगाडा प्रेमींसाठी खूशखबर ! : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला महत्वाचा...

बैलगाडा प्रेमींसाठी खूशखबर ! : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला महत्वाचा निर्णय

पुणे : गेली अनेक वर्षे बंद असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्या आहेत, बैलगाडा शर्यत बंदीविरोधात अनेक आंदोलने करण्यात आली होती. या काळात अनेक बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना बैलाचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीत झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. या बंदीविरोधात आंदोलनेही करण्यात आली. त्यावेळी आंदोलकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली. दरम्यान, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची माागणी सातत्याने करण्यात येत होती. आता हे सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

सावधान ! राज्यातील “या” जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

आंबेगाव तालुक्यातील थापलिंग यात्रेत माध्यमांशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले कि, बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे गुन्हे ज्या पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत, त्या पोलिस स्टेशमधून पोलिस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे, त्यानंतर संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडून गृहमंत्र्यांकडे पाठवला जाईल, गृहमंत्री त्याला मान्यता देतील, तो पुढे न्यायालयात दाखल करून मग गुन्हे मागे घेतले जातील, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल ची दरवाढ सुरुच, आठवड्यात सहाव्यांदा वाढ

संबंधित लेख

लोकप्रिय