मांसाहारी लोक प्रोटीनसाठी (Protein) चिकन, मटण आणि अंडी खातात. चिकन, मटण आणि अंडी यामुळे आजारांशी लढण्याची ताकद (Strength to Fight Diseases) मिळते. मासेसुद्धा प्रोटीनचा मोठा सोर्स (Rich Sours of Protein)आहेत. (Tuna fish)
मासे खाण्यामुळे स्मरणशक्ती ही (Memory) वाढते. काही आजारांमध्ये डॉक्टर देखील मासे खाण्याचा सल्ला देतात. मासे खाण्याचे अनेक फायदे (Benefits) आहेत. अनेक प्रकारचे मासे बाजारात उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक माशाची चव वेगळी असते. तसंच त्यातून मिळणारे पोषक घटकही वेगळे असतात.
यावेळी आपण अती महागडा जाणून घेऊया ट्यूना मासा (Tuna Fish) म्हणजेच कुपा मासा खाण्याने होणारे फायदे.
ट्यूना मासा एक विशेष प्रकारचा मासा आहे, ज्याला कुपा मासा देखील म्हटलं जातं. इतर माशांपेक्षा याचा आकार वेगळा असतो. समुद्राच्या पाण्यामध्ये आढळणारा हा मासा चवीला तर चांगला असतो, शिवाय शरीराला देखील लाभदायक आहे. या माशाने अनेक आजार दूर पळतात. म्हणून याला जागतिक बाजारात मोठी मागणी आहे.
ट्यूना माशांचा आकार वेगवेगळ्या प्रजातींमध्ये मोठ्या प्रमाणात बदलू शकतो; उदाहरणार्थ, यलोफिन टूना तीन ते 15 किलो इतका वजनाचा असतो. तर नॉर्दन ब्लूफिन ट्यूनासारख्या मोठ्या वाणांचे वजन वीस तीस किलो पर्यंत असू शकते. व्हेल आणि डॉल्फिन आकाराच्या कुळातील हा वेगवान मासा आहे. शार्क माशासारखे छोटे मासे या ट्यूनाचे भक्ष असते.
ट्यूना माशाचे मांस बर्याचदा गोठवलेले, ताजे किंवा डबाबंद विकले जाते आणि सँडविच, पुलाव, फ्राय आणि सुशी रोलसाठी लोकप्रिय आहार म्हणून जगभरात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते.
भारतात ट्यूना मासा फक्त जागतिक स्तरावर1 टक्केच उपलब्ध आहे. बंगालच्या खाडी मध्ये कधी कधी हे मासे मिळतात, जागतिक बाजारात अती महाग असलेले हे मासे युरोप आणि अमेरिका खंडात आणि ऑस्ट्रेलिया मध्ये लोकप्रिय आहेत. ध्रुवीय समुद्र वगळता ट्यूना महासागरातील पाण्याच्या सर्व प्रमुख भागांमध्ये आढळले असले तरी, बहुतेक जागतिक ट्यूनाचा वावर पॅसिफिक, अटलांटिक आणि प्रशांत महासागरात आहे. जागतिक उत्पादनाच्या एकूण 66 टक्के ट्यूना या ठिकाणी मिळतो.
जागतिक आणि भारतीय बाजारात चांगला भाव मिळतो म्हणून केरळ, तामिळनाडू, ओडिशा, बंगाल, श्रीलंका,, आदी किनार पट्टी राज्यातील आणि देशातील सराईत मच्छिमार नोव्हेंबरपासून फक्त ट्यूना मासेमारी साठी खोल समुद्रात यांत्रिक जहाजे घेऊन जातात.
बंगालच्या उपसागरात आणि अंदमान आणि निकोबारच्या समुद्रात नोव्हेंबर-जानेवारी दरम्यान आणि डिसेंबर-मार्च दरम्यान पूर्व किनारपट्टीवर मच्छिमार अधिक लक्ष केंद्रित करतात.
नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचलेला हा मासा परवानगी शिवाय मारता येत नाही. हा मासा पाणबुडीतून निघणाऱ्या टॉर्पीडो शस्त्रासारखा आहे. या आकारामुळं तो समुद्रात लांब पल्ल्यापर्यंत वेगाने पोहू शकतो. तज्ञांच्या मते, या माशाची लांबी 3 मीटर पर्यंत असू शकते आणि वजन सुमारे 250 किलो आहे. या माशामुळं मानवाला कोणतीही हानी होत नाही. हे इतर लहान मासे खातात, कारण लहान मासे हे त्याचं खाद्य आहे.
चीन, फिलिपाईन्स, अमेरिका, जपान, थायलंड, मलेशिया आणि आफ्रिकन किनारी देशांनी ट्यूना मासेमारीला बंदी घातली आहे, त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. कारण अती मागणी आणि बेकायदेशीर मच्छिमारी मुळे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
सूरमयी, रावस पेक्षा तिप्पट दर भारतीय बाजारात मिळतो, म्हणून कमाई साठी साधारण किंवा यांत्रिक बोटी द्वारे याची खोल समुद्रात शिकार केली जाते.
असा हा मासा बाजारात कुठे सहजा सहजी मिळत नाही, कारण हा मासा एक्सपोर्ट होतो. मिळाला तर नशीबवान असाल.
संकलन – क्रांतीकुमार कडुलकर (sources internet)
हेही वाचा :
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ
भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून
धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास