Sunday, April 28, 2024
HomeNewsविमान अपघातात 132 जणांचा मृत्यू, डीएनए चाचणीद्वारे 120 मृतांची ओळख पटली

विमान अपघातात 132 जणांचा मृत्यू, डीएनए चाचणीद्वारे 120 मृतांची ओळख पटली

बिजिंग : चीनमधील ग्वांगझूजवळ क्रॅश झालेल्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानातील सर्व 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बोईंग 737 असे या अपघातग्रस्त विमानाचे नाव होते.

चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या बोईंग 737 विमानाने 21 मार्चला चीनच्या कुनमिंगहून ग्वांगझू गंतव्यस्थानावर जाण्यासाठी उड्डाण केले होते, परंतु हे विमान दुपारी 2:38 च्या सुमारास कोसळले. या अपघातात विमानातील सर्व जणांचा मृत्यू झाला. या विमानातून 123 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. दक्षिण-पश्चिम चीनच्या कुनमिंग शहरात सोमवारी 29,000 फूट उंचावरून विमान जात असताना हे विमान डोंगराळ भागात विमान हे कोसळले, त्यामुळे पर्वताला आग लागली.

सावधान ! राज्यातील “या” जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

चीनच्या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हू झेजियांग यांनी सांगितले की, तपास पथकाचे ऑपरेशन पुर्ण झाले आहे. तपास यंत्रणेने डीएनए चाचणीद्वारे 120 मृतांची ओळख पटली आहे. मात्र, ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याचं कारण अद्याप समोर आलं नाही. 

दरम्यान, तपास पथकाला विमानातील दोन्ही ब्लॅक बॉक्स अपघाताच्या चौथ्या दिवशी सापडला आहे.

आशा व गटप्रवर्तकांचा २ दिवशीय राज्यव्यापी संप, जिल्हा परिषदांवर करणार तीव्र आंदोलन

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय