Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : उद्योगनगरीत उद्या बंद, उपनगरात बंदची जोरदार तयारी

PCMC : उद्योगनगरीत उद्या बंद, उपनगरात बंदची जोरदार तयारी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील व सहकारी शांततेत आंदोलन करत होते. त्या आंदोलकांवर राज्य सरकारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुषपणे लाठी हल्ला केल्या आरोप केला जात आहे. याचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे. Bandh tomorrow in Udyog Nagar, strong preparations for bandh in suburbs ‌

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, जातीनिहाय जनगणना करावी, एकाच पक्षाचे असलेले केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी तातडीने हालचाली करून आरक्षण मार्गातील सर्व अडथळे दूर करावेत व मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे. समाजाची दिशाभूल करू नये. आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी राज्य सरकारने करावी. अमानुष लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. मराठा आरक्षण आंदोलकावर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत,आदी मागण्यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये बंद पुकारण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.

सतीश काळे यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे प्रकाश जाधव, लहू लांडगे, जीवन बोराडे, नकुल भोईर, अभिषेक म्हसे, सागर तापकीर, लक्ष्मण रानवडे, वैभव जाधव, सुनिता शिंदे, गोपाळ मोरे, रविशंकर उबाळे, सुनील शिंदे, लक्ष्मण पांचाळ, दिपक कांबळे, योगेश पाटील, निलेश शिंदे, स्वप्निल परांडे, प्रविण कदम, वचिष्ठ आवटे, वासुदेव काटे पाटिल, अमोल निकम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने ही शनिवारी (दि.९ सप्टेंबर) उद्योगनगरी बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला कॉंग्रेस, ठाकरे शिवसेना, आम आदमी पार्टी, मनसे, शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वराज् अभियान तसेच शहरातील विविध पुरोगामी संघटनानी पाठिंबा दिला आहे.

आरोग्यसेवा व अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. सर्व कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये, शहरातील व्यापारी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मराठा मोर्चाने केले आहे. पिंपरी चिंचवड शहर परिसरात सोशल मीडियावर बंदचे आवाहन करण्यात येत आहे.

आकुर्डी, चिखली, तळवडे, रुपीनगर, निगडी, पिंपरी, कासारवाडी, भोसरी, काळेवाडी, राहटणी, वाकड, पिंपळे सौदागर सह शहराच्या प्रमुख भागात बंदचा मोठा प्रभाव पडणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय