Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : वरुथिनी एकादशी दिनी आळंदी मंदिरात पुष्प सजावट

ALANDI : वरुथिनी एकादशी दिनी आळंदी मंदिरात पुष्प सजावट

आळंदी / अर्जुन मेदनकर : वरुथिनी एकादशी निमित्त परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी हरीनाम गजरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी झाली. उन्हाचा पारा वाढला असतानाही भाविकांची दर्शनास मोठी गर्दी झाली होती. alandi news

माउली देवस्थानाने भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून खुल्या दर्शन बारीत छत लावून, तसेच थेट दर्शन बारीत पिण्याचे पाण्याची व्यवस्था केल्याने भाविकांची सोय झाली. सुमारे दिड ते दोन तास मंदिरात श्रींचे दर्शनास लागल्याचे भाविकांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र आळंदी नेहमी हजारो भाविकांचे गर्दीने फुललेली असते. यात लग्न समारंभ, एकादशी असल्याने अधिकची वाढ झाली. सुमारे ५० हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. उन्हाचा पारा चढलेला असतानाही भाविकांनी आळंदी मंदिरात श्रींचे दर्शनास गर्दी केली.

एकादशी निमित्त श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. श्रींचे वैभवी दर्शन व्यवस्था आळंदी संस्थानने सोशल मीडियाचे माध्यमातून देखील सुरु ठेवली होती.

कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शन देण्यासाठी व्यवस्थापक माउली वीर, तुकाराम माने, ज्ञानेश्वर पोंदे देवस्थानचे सेवक कर्मचारी यांनी काम पाहिले. श्रींचे महाप्रसाद देण्यास सेवाभावी पणे सेवक बल्लाळेश्वर वाघमारे आणि सेवकांनी सेवा रुजू केली. alandi

भाविकांना थेट दर्शनबारीत पिण्याचे पाणी देण्यात तत्परता ठेवून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी लक्षपूर्वक नियोजन करण्यात आले होते.

आळंदी मंदिरात एकादशी निमित्त श्रींचे वैभवी गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. या निमित्त मंदिरात हरिपाठ, देहुकरांचे कीर्तन सेवा तसेच ह.भ.प. संतोष मोझे यांचे वतीने हरीजागर सेवा होत असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरा बाहेर मात्र काही वारकरी , भाविकांनी महाद्वारातून श्रींचे मुख दर्शन घेत नगरप्रदक्षिणा करीत स्थान माहात्म्य जोपासले. इंद्रायणी नदी घाटावर देखील भाविकांनी स्नानास गर्दी करीत तीर्थक्षेत्री आचमन केले. आळंदीतील नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी एकादशी साजरी केली. alandi news

मंदिरात असे झाले धार्मिक कार्यक्रम

यात एकादशी निमित्त पहाटे घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांना सुलभ दर्शन, दुपारचा महानैवेद्य, दर्शन, श्रींना पोशाख, दर्शन, चार वाजता प्रवचन सेवा, सडे सहा वाजता कीर्तन सेवा, धुपारती, त्या नंतर पुन्हा दर्शन सुरु करण्यात आले. १२ ते पहाटे ४ हरी जागर सेवा संतोष महाराज मोझे यांचे वतीने रुजू झाली. alandi news

दुपारी उटी पूजा झाली. फक्त महानैवेद्य आणि श्रींचे आरती प्रसंगी दर्शन थोडा वेळ बंद ठेवण्यात आले होते. सावतामाळी मंदिर ( चऱ्होली बुद्रुक ) येथील सप्ताहात ह. भ. प. तुकाराम महाराज ताजणे यांची हृदयस्पर्शी वाणीतून हरिनाम गजरात एकादशी दिनी सप्ताहात कीर्तन सेवा झाली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

संबंधित लेख

लोकप्रिय