Kshitij Zarapkar : मराठी सिनेसृष्टीतून एक दु:ख बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते क्षितीज झारापकर यांचं आज (5 मे) निधन झालं आहे. एकुलती एक, आयडियाची कल्पना यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेले अभिनेते क्षितीज झारापरक यांचे (Kshitij Zarapkar) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्करोगामुळे त्यांच्या दादरच्या राहत्या घरी निधन झाल.
अभिनेते क्षितीज झारापकर यांनी वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. क्षितिज यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांत विविध भूमिका साकारल्या होत्या. एकुलती एक, आयडियाची कल्पना, गोळाबेरीज, इश्श्य यांसारख्या चित्रपटांत काम केलंय. या चित्रपटातील त्यांच्या मुख्य भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. या वृत्तामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
क्षितीज झारापकर यांच्यावर कर्करोगाच्या आजारामुळे बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मावळली.
दरम्यान, दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील त्यांच्या राहत्या घरी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप
कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे
ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई
मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट
ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन
धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना
ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस