Monday, May 13, 2024
Homeताज्या बातम्याKangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत निवडणूकीच्या रिंगणात, ‘या’ मतदार संघातून लढणार...

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत निवडणूकीच्या रिंगणात, ‘या’ मतदार संघातून लढणार निवडणूक

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) पाचवी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीत अनेक राज्यांतील १११ उमेदवारांची नावे आहेत. भाजपच्या या यादीत अनेक मोठ्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. भाजपने काही मंत्री आणि काही खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. तर यामध्ये अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिला लोकसभेचे तिकिट देण्यात आले आहे.

कंगना राणौत नेहमीच आपल्या अभिनयामुळेच नव्हे तर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता कंगना राजकारणात प्रवेश करत आहे. भाजपने जाहिर केलेल्या उमेदवारांच्या पाचव्या यादीत अभिनेत्री कंगना राणौत ला उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला तिकीट देण्यात आलं आहे.

नुकतेच भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील बगलामुखी मंदिरात देवीचा आशीर्वाद घेतला होता. यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली की, आईने आशीर्वाद दिल्यास ती मंडी लोकसभा मतदारसंघातून नक्कीच निवडणूक लढवेल.

भाजपने जाहिर केलेल्या यादीत केंद्रीय मंत्री व्हीके सिंह आणि अश्विनी चौबे यांची तिकिटे कापण्यात आली आहेत. पक्षाने वरुण गांधी यांचेही तिकीट कापले आहे. तर काही जागांवर उमेदवारही बदलण्यात आले आहेत. झारखंडमधील दुमका मतदारसंघातून यापूर्वी जाहीर केलेले उमेदवार सुनील सोरेन यांचे तिकीट रद्द करून पक्षाच्या वतीने सीता सोरेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !

महत्वाची बातमी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह ‘हे’ बारा ओळखपत्र ग्राह्य धरणार

अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !

शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय