Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याMaharashtra Loksabha : भाजपची पाचवी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 'या' तीन नेत्यांना संधी

Maharashtra Loksabha : भाजपची पाचवी यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ तीन नेत्यांना संधी

Maharashtra Loksabha : भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचवी यादी जाहीर केली आहे. (Maharashtra Loksabha BJP List) भाजपच्या या यादीत अनेक राज्यांतील १११ उमेदवारांची नावे आहेत. भाजपच्या या यादीत अनेक मोठ्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी २० जणांची यादी भाजपाने आधीच जाहीर केली आहे. आता भाजपाने महाराष्ट्रातील आणखी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. Maharashtra Loksabha

भाजपने जाहीर केलेल्या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील एकुण ३ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भंडारा गोंदियातून सुनील बाबूराव मेंढे, गडचिरोलीतून अशोक महादेव नेते भाजपाचे उमेदवार आहेत. तर सोलापूरमध्ये राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा आहेत. अशात जागा वाटपाचा पेच कायम असताना भाजपने महाराष्ट्रात तीन नावं जाहीर केली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पाचव्या यादीमुळे शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना मिळणाऱ्या जागा या केवळ २५ जागांमधून असतील हे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भाजपाचे आमदार राम सातपुते यांचा लढा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध होणार आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनदा पराभव झाला होता. आता सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांना रिगणात उतरवण्यात आले आहे.

माजी न्यायमूर्तींना उमेदवारी

भारतीय जनता पक्षाने एका माजी न्यायमूर्तींना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधून उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच ते पदावर पायउतार झाले होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !

महत्वाची बातमी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह ‘हे’ बारा ओळखपत्र ग्राह्य धरणार

अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !

शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय