Tuesday, May 7, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : जगप्रसिद्ध उज्जैन महाकालेश्वर मंदिरात मोठी दुर्घटना

मोठी बातमी : जगप्रसिद्ध उज्जैन महाकालेश्वर मंदिरात मोठी दुर्घटना

Ujjain Mahakaleshwar Temple : जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वराच्या गर्भगृहात एक मोठी दुर्घटना घटना घडली आहे. उज्जैन महाकालेश्वर (Ujjain Mahakaleshwar) मंदिरात सोमवारी पहाटे भस्म आरतीदरम्यान गर्भगृहाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात पुजाऱ्यासह १३ जण भाजले असल्याची माहिती समोर येत आहे.

श्री महाकालेश्वर मंदिरात आज सकाळी भस्म आरती सुरू होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आरतीवेळी गुलाल उधळल्याने आग भडकली, त्यावेळी या घटनेत पुजाऱ्यासह 13 जण भाजले आहेत. या दुर्दैवी घटनेदरम्यान मंदिरात हजारो भाविक उपस्थित होते. या घटनेतील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या गाभाऱ्यात आरतीवेळी सुरू होती तसेच सर्वजण महाकाल सोबत होळी साजरी करत होते. मागून आरती करत असलेल्या पुजारी संजीव यांच्यावर कोणीतरी गुलाल फेकला. हा गुलाल दिव्यावर पडला. त्यावेळी गुलालात रसायन असल्याने आग भडकली. (Ujjain Mahakaleshwar)

तसेच, गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतीला रंग आणि गुलालापासून वाचवण्यासाठी तेथे फ्लेक्स लावण्यात आले होते. यामध्येही आग पसरली. काही लोकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले संजीव पुजारी, विकास, मनोज, सेवाधारी आनंद कमल जोशी यांच्यासह १३ जण भाजल्याची माहिती आहे.

दरम्यान, उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी माध्यामांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणीही गंभीर नाही. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी दिली आहे.

या अपघाताच्या घटनेवेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा मुलगा वैभव यादव हा देखील मंदिरात होता.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !

महत्वाची बातमी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह ‘हे’ बारा ओळखपत्र ग्राह्य धरणार

अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !

शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय