Wednesday, May 22, 2024
Homeनोकरीवन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

मुंबई : वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेदरम्यान काही बाह्य हस्तक्षेप, उमेदवारांना नोकरी देण्याची आमिषे देणे, अफवा पसरविणे, अपप्रचार करणे अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन महसूल व वन विभागाने केले आहे.

वनविभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील पदे भरण्यासाठी जाहीरात देऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवा, अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशाप्रकारच्या अपप्रवृत्ती, अपप्रचार निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिस यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन महसूल व वन विभागाने केले आहे.

तसेच जे उमेदवार भरती प्रक्रियेवर अनैतिक मार्गाने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असेही महसूल व वन विभागाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटमुळे नेटकरी बुचकाळ्यात, सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा

ट्विटरला न्यायालयाचा मोठा दणका, या प्रकरणात ठोठावला ५० लाखांचा दंड

मोठी बातमी : पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार म्हणाले, मला गुगली कशी टाकायची आणि कुठे टाकायची माहिती

शेतकऱ्यांसाठी खूशखबर : शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ, वाचा काय आहे योजना

नोकरीच्या बातम्या वाचा :

ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय