Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार म्हणाले, मला गुगली कशी टाकायची आणि कुठे टाकायची माहिती

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पहाटेच्या शपथविधीवरून काही गौप्यस्फोट केले. त्यामध्ये पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या आशीर्वादानेच झाला होता. किंबहुना भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यांवर प्रत्यूत्तर दिले. पवार म्हणाले, २०१४ च्या निवडणुका झाल्यानंतर भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा घेतलेली होती. २०१९ ला फडणवीस भेटले त्यात अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

पवार पुढे म्हणाले, फडणवीसांनी पवार साहेबांनी धोरण बदलल्याचे सांगितले. मी धोरण बदलले तर नंतर दोन दिवसांनी शपथ घेण्याचे कारण काय होते किंवा अशी चोरून पहाटे शपथ का घेतली? त्यांच्या शपथविधीनंतर दोन दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला. याचा स्पष्ट अर्थ आहे की सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, आम्ही किती अस्वस्थ आहोत, ही त्यांची अस्वस्थता महाराष्ट्रासमोर यावी, यादृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या. असं पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले, माझे सासरे सदू शिंदे हे देशातील उत्तम बॉलर होते. त्यांनी गुगलीने अनेक मोठमोठ्या लोकांच्या विकेट घेतल्या होत्या. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे गुगली कशी टाकायची आणि कुठे टाकायची हे माहिती होते. विकेट दिली तर ती घेतलीच पाहिजे. पण विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का?

१९७८ साली सरकार स्थापन करताना आम्ही काँग्रेसची फसवणूक केली असे सांगतात. फडणवीस जे सांगतात की शिंदे आणि त्यांनी निवडणूक एकत्रित लढवली तशी परिस्थिती तेव्हा नव्हती. त्यावेळी स्व. इंदिरा गांधींचे काँग्रेस आणि स्वर्ण सिंह यांचे काँग्रेस असे आम्ही एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. आम्ही काँग्रेसविरोधात निवडणूक लढवली व त्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी काही गोष्टी त्याठिकाणी झाल्या. पण काँग्रेस (एस) हा स्वतंत्र पक्ष तसाच राहून आम्ही सरकार बनवले. त्यावेळी फडणवीस लहान असल्याने त्यांना हा कालखंड माहिती नसावा. मी त्यांना दोष देत नाही. हे त्यांचं अज्ञान होतं. अशी टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

हे ही वाचा :

सरकार जात आणि धर्माच्या आधारावर गुन्हेगारांना संरक्षण देत चंद्रशेखर आझाद यांचा आरोप, काल झाला होता हल्ला

ब्रेकिंग : चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला

ब्रेकिंग : ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

शेतकऱ्यांसाठी खूशखबर : शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ, वाचा काय आहे योजना

राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता; १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; जूनअखेर २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर

नोकरीच्या बातम्या वाचा :

ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles