Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला

सहारनपूर : आझाद समाज पक्षाचे (भीम आर्मी) प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला आहे. आझाद यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या यावेळी त्याच्या पोटाला स्पर्श करून गोळी बाहेर आली. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

---Advertisement---

चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे फोटो समोर आले आहेत. समोर आलेल्या फोटोत गोळी त्याच्या कमरेला स्पर्श करत बाहेर आल्याचे दिसत आहे. यासोबतच वाहनांच्या काचाही तुटलेल्या दिसत आहेत. चंद्रशेखर दिल्लीहून आपल्या घरी परतत होते, त्यावेळी हा हल्ला झाला.

हरियाणा क्रमांकाच्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रशेखर यांच्यावर 4 राउंड फायर केले. गोळीबारात आझाद यांच्या गाडीच्या काचाही फुटल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहन क्रमांक HR-70D-0278 दिसत आहे. हल्ल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

---Advertisement---

रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी आहे. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. एसएसपी डॉ. विपिन टाडा सहारनपूर यांनी डीजीपी विजय कुमार यांना फोनवर संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles