Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयट्विटरला न्यायालयाचा मोठा दणका, या प्रकरणात ठोठावला ५० लाखांचा दंड

ट्विटरला न्यायालयाचा मोठा दणका, या प्रकरणात ठोठावला ५० लाखांचा दंड

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत केंद्र सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये काहीसा वाद बघायला मिळाला. या वादाच्या दरम्यान जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर हे खरेदी केले. तेव्हा पासून ट्विटर हे सोशल मीडिया सातत्याने चर्चेत आहे. असे असताना आता न्यायालयाने ट्विटरला ५० लाखांचा दंड पण ठोठावला आहे.

२०२१ आणि २०२२ मध्ये मोदी सरकारने ट्विटरला काही आक्षेपार्ह लिंक हटवण्याची मागणी केली होती. केंद्र सरकार अशा प्रकारची मागणी करू शकत नाही म्हणत ट्विटरने न्यायालयात धाव घेतली होती. कर्नाटक उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. देशातील शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सरकार अशा प्रकारचे आदेश देऊ शकतं, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. या सोबतच, सरकारने दिलेले आदेश वेळेत पाळले नाहीत आणि उशीर कशामुळे झाला याबाबत योग्य कारण न दिल्यामुळे कोर्टाने ट्विटरला ५० लाख रुपये दंड ठोठावला आहे. न्या. कृष्ण. एस. दीक्षित यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.

हायकोर्टाने ट्विटरच्या सर्व याचिका रद्द केल्या आहेत. ४५ दिवसात दंडाची रक्कम कर्नाटक राज्याच्या विधी सेवा प्राधिकरणात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच, ४५ दिवसांमध्ये सुनावलेला दंड जमा न केल्यास; पुढे एका दिवसाला ५,००० रुपये दंड ठोठावण्यात येईल असंही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार म्हणाले, मला गुगली कशी टाकायची आणि कुठे टाकायची माहिती

सरकार जात आणि धर्माच्या आधारावर गुन्हेगारांना संरक्षण देत चंद्रशेखर आझाद यांचा आरोप, काल झाला होता हल्ला

ब्रेकिंग : ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

शेतकऱ्यांसाठी खूशखबर : शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ, वाचा काय आहे योजना

राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता; १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; जूनअखेर २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर

नोकरीच्या बातम्या वाचा :

ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय