Thursday, December 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : राष्ट्रीय एकात्मता व बंधुत्वाची भावना वाढवावी : मुफ्ती मौलानाचे आवाहन

PCMC : राष्ट्रीय एकात्मता व बंधुत्वाची भावना वाढवावी : मुफ्ती मौलानाचे आवाहन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहरात रमजान ईद (Ramadan) उत्साहात साजरी करण्यात आली. भोसरी, घरकुल, निगडी, चिंचवड, आकुर्डी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर, कासारवाडी, दापोडी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, रावेत परिसरात ईदची नमाज सकाळी 8 ते 10 दरम्यान विविध मशिदीत, मदरचा ईदगाह मैदानात धर्मगुरू मुफ्ती, मौलाना, हाफीज साहब यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला. PCMC

चिंचवड (chinchwad) परिसरात चिंचवडगाव-आलमगीर शाही मशीद, मौल्लाना मिनहाज असरफी, मौल्लाना इनामुल हक, चिंचवड स्टेशन-मजीद ए अम्मार-हाफीज मौन्नूद्दीन, मोहननगर-मजीद ए हिदायतूल मुस्लमीन-हाफिज वसीम साहब, विद्यानगर-मजीद ए अक्सा-मौल्लाना इम्रान मोन्नुद्दीन साहब, आकुर्डी-मजीद ए मदिना-मुफ्ती अबीद साहब, आकुर्डी-मजीद ए अक्सा-मुफ्ती अब्दुल कादीर साहब, काळभोरनगर-मजीद ए फारूकीया-हाफीज लायक साहब, बिजलीनगर-मजीद ए नूरईलाई-मौल्लाना अब्दुल सकूर साहब, वाल्हेकरवाडी-मजीद ए बीसाल-मौल्लाना खुर्शीद साहब, चिंचवडेनगर-मजीद ए हुसैनी-मौल्लाना आखीब साहब, दळवीनगर-मजीद ए बीसाल-हाफीज जैन्नूद्दीन साहब, चिंचवडगाव-मजीद ए ईदगाह-मौल्लाना मिनाज साहब यांनी नमाज पढविला.

अल्लाहाचा आज्ञेप्रमाणे शहरातील सर्व वयोगटातील मुस्लिम बांधव व महिलांनी 30 दिवसांचे उपवास त्यांच्या क्षमतेनुसार केले. दिवसभरात पाच वेळा नमाज पठण केले. दररोज संध्याकाळी रोजा इफ्तारी रोज (रोजा सोडण्याची) वेळ झाल्यानंतर सामुहीकरित्या करून तराबी नमाजमध्ये पवित्र कुराणचे पठण मुफ्ती मौल्लाना यांनी नमाज पढविला. चंद्रदर्शन झाल्यानंतर आज सकाळी मुस्लिम बांधव नवीन कपडे, पारंपारिक वेशभूषा परिधान करून रमजान ईदच्या नमाज पठण केले. pcmc news

विविध ठिकाणी नमाज पठण सामुहीकरित्या पार पडल्या, त्यावेळी धर्मगुरु मुफ्ती, मौल्लाना, हाफिज साहब यांनी अल्लाहाची शिकवण आहे. सर्वांवर प्रेम करा, रमजान ईद सर्वांना आदर करण्यासाठी एकत्रित काम करण्याची प्रेरणा देण्याचा सण आहे. ईदच्या नमाज पठणानंतर एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोणाचाही द्वेष करू नका, एकात्मता व बंधुत्वाची कास अंगीकारून एकत्रित आपली दिनचर्या पार पाडा. मुलांना शिक्षण देऊन त्यांना भावीकाळात आदर्श नागरिक कसे करता येईल. यासाठी आई-वडिलांनी प्रयत्नाची पराकाष्टा करावी. मुलांनी देखील आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संदेश यावेळी धर्मगुरू करवी देण्यात आला.

तसेच, रमजान ईदमध्ये गरजूंना मदत करण्यासाठी जकात दिली जाते, दान केले जाते. प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपल्या उत्पन्नाचे 2.5 टक्के रक्कम, धान्य गरिबांसाठी दान केले पाहिजे, असा नियम असल्यामुळे अनेक बांधवांनी दिनदुबळ्या, सामाजिक आर्थिक उपेक्षितांना दान करून आपली जबाबदारी पार पाडून आज ईदच्या दिवशी शिरखुर्मा एकमेकांना घरी जाऊन त्याचा आस्वाद घेतला. अनेकांनी मोबाईलद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या, सर्वठिकाणी ईद साजरी करण्यासाठी विविध मशीदीचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले. पोलीसांनी सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

संबंधित लेख

लोकप्रिय