Junnar / आनंद कांबळे : माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण करण्याचा पाठपुरावा २०१८ पासून शासनाकडे सुरू होता. आंबेगव्हाण येथील बिबट सफारी या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची संकल्पना पहिल्यांदा शासन दरबारी मांडून याकरिता पाठपुरावा केल्यानंतर ८० कोटींचा निधी मंजूर झालेला आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे कामकाज प्रत्यक्षरीत्या सुरू होणार आहे. जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा या मागणीकरिता हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी स्पष्ट केले.
माणिकडोह बिबट निवारा केंद्र विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन मंगळवार (दि.०३) रोजी संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. माजी आमदार अतुल बेनके, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, स्मिता राजहंस, अमृत शिंदे, प्रदीप चव्हाण,सुरज वाजगे, राजेंद्र कोल्हे, रवींद्र हांडे, दर्शन फुलपगार, अविनाश कर्डिले, दत्ता गवारी, राजू डुंबरे, भाऊ कुंभार, तौसिफ कुरेशी आदींसह विविध गावांचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. (Junnar)
आमदार शरद सोनवणे म्हणाले, मानव-बिबट संघर्षबाबत मी वेळोवेळी केलेली आंदोलने ही राजकीय स्वरूपाची नसून ती गरज होती तर माझी लढाई ही सर्वसामान्य जनतेसाठी होती. जुन्नर वनविभागात बिबट मानव संघर्ष सुरू असून बिबट हल्ल्यात आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पशुधनाची देखील हानी झालेली आहे. याकरिता विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करून समस्या सोडवावी लागणार आहे. जुन्नर वनविभागाने राज्यातील पहिला सौर कुंपण सारख्या उपाय योजनेचे आमदार शरद सोनवणे यांनी कौतुक करीत या प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची सूचना यावेळी वनविभागाला केली.
माजी आमदार अतुल बेनके म्हणाले, वीज वितरण विभागावर अवलंबून न राहण्याकरिता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याकरिता गावागावात सौर ऊर्जेचे स्रोताचे कामकाज चालू केले आहे. बिबट निवारण समस्येकरिता अधिकारी व नागरिकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. (Junnar)
उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी ते म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून जुन्नर वन विभागात बिबट संघर्ष सुरू असून जनतेच्या सहनशीलतेचे कौतुक करावे तितके कमी आहे. बिबट हा अनुसूची १ मध्ये समावेश असल्याने बिबट नसबंदी प्रस्ताव देशात पहिल्यांदा जुन्नर वनविभागाने केंद्र शासनाकडे प्रस्तावित केलेला असून तो मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. माणिकडोह निवारा केंद्राचे विस्तारीकरण करण्याकरिता १२.६९ हेक्टर जागा पाटबंधारे विभागाकडून वन विभागाकडे हस्तांतरित झालेली असून या जागेवर येत्या तीन महिन्यात ४० बिबट्यांची क्षमता असलेले निवारा केंद्र उभे राहणार आहे. त्यानंतर अधिकच्या जागेत ४० बिबटे ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ७५ बिबट स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दिलेला आहे. जुन्नर वन विभागात पाच बेस कॅम्प सुरू आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी केले, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी स्वागत व आभार मानले तर सूत्रसंचालन वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले.
(Junnar)
हे ही वाचा :
मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी
गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार
डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…
NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती