Monday, January 13, 2025
Homeजुन्नरJunnar : केंद्रस्तरीय यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव उच्छिल येथे संपन्न

Junnar : केंद्रस्तरीय यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव उच्छिल येथे संपन्न

Junnar /आनंद कांबळे : उच्छिल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला. या स्पर्धेत सर्व मुलांचा व शिक्षकांचा आनंद व उत्साह पाहण्यास मिळाला. या शाळेत यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात प्रमुख उपस्थिती आपटाळे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग ह्या होत्या. त्यांनी उपस्थित सर्व स्पर्धक व शिक्षकांना संबोधित केले व दुपार सत्रात सांधिक स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना त्यांच्या शुभहस्ते पेन, गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या महोत्सवात सर्व केंद्रातील विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या हृदयातून कला, क्रीडा आणि संस्कृतीची ज्योत घेऊन आला होता. दिवसभर विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचे अद्भुत प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन नवले हे होते तर कार्यक्रमाचे उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समिती सदस्या सविता आढारी, वर्षा नवले, कांचन नवले व रेश्मा केंगले यांच्यासह शिवाजी नवले, जयानंद नवले उपस्थित होते. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे प्रमुख व उच्छिल केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख अन्वर सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Junnar)

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्छिल शाळेचे पदवीधर शिक्षक सुभाष मोहरे यांनी केले तर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व स्पर्धेविषयी माहिती आणि प्रास्ताविक अन्वर सय्यद यांनी दिली. या प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा शालेय शिक्षणात खेळाचे महत्व व खेळासाठी वेळ आणि खेळातील आपल्या जीवनातील महत्त्व याबाबत उद्बोधन केले तर सुभाष मोहरे क्रीडा समन्वयक यांनी आज दिवसभरामध्ये वैयक्तिक सांघिक व सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहात व खेळणीच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील व गावातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारच्या स्पर्धा घेणे व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा असे प्रतिपादन संचिता अभंग यांनी केले.

या स्पर्धेतील सर्व विजयी स्पर्धकांना केंद्रप्रमुख पुष्पलता पानसरे व शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विलास पानसरे यांच्या वतीने प्रमाणपत्र व पेन देण्यात आला. उच्छिल शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन नवले यांनी बक्षीसे देऊन मान्यवरांच्या हस्ते सर्व विजयी स्पर्धक यांना सन्मान करण्यात आला. यावेळी उच्छिल केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी शिक्षक सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

यामध्ये शालेय विविध स्पर्धेमध्ये लोकनृत्य, बेडूक उड्या, चमचा लिंबू, बडबड गीते, धावणे, उंच उडी, गोळा फेक, बुद्धिबळ, लंगडी, पोवाडा, आट्या-पाट्या, प्रश्नमंजूषा, भजन, कबड्डी व खो- खो, वक्तृत्व या विविध स्पर्धा सर्व मुले ही आपल्या शारीरिक क्षमतांचे प्रदर्शन करताना पाहावयास मिळाले. मैदानात खेळाचे उत्साहपूर्ण वातावरण पाहण्यास मिळाले.

दिवसभर चाललेल्या या स्पर्धांनंतर विजेत्यांची घोषणा करण्यात आली. विजेत्यांना प्रशस्तीपत्र व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुढील बीटस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांना केंद्राच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच वानेवाडी शाळेच्या उपक्रमशिल शिक्षिका शोभा उंडे यांचा व्यासपीठावर वाढदिवस साजरा केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेसाठी प्राविण्य मिळवले यात विठ्ठल जोशी व शोभा उंडे यांचा व सहभागी सागर भवारी व पूनम तांबे यांचा सन्मान करण्यात आला. संयोजन व नियोजन बाळू कडू, स्मिता ढोबळे, आरती मोहरे व लिलावती नांगरे यांनी केले. शेवटी सर्वांचे उच्छिल शाळेच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

Junnar

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी

गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार

डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…

NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय