Friday, November 22, 2024
Homeआंबेगावशून्य शिक्षकी शाळेवर शिक्षकांची होणार नियुक्ती!

शून्य शिक्षकी शाळेवर शिक्षकांची होणार नियुक्ती!

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील शून्य शिक्षकी शाळांवर तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी, या मागणीला घेऊन अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ने आंबेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. Teachers will be appointed on zero teacher school

यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला वाळूंज व गटशिक्षण अधिकारी श्रीमती सविता माळी यांनी सकारात्मक चर्चा करून लेखी आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. 

आंबेगाव तालुक्यातील, पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे त्या शाळा शून्य शिक्षकी शाळा झाल्या होत्या. त्याचबरोबर अनेक शाळांची पटसंख्या 10 हून अधिक आहे. परंतू त्या ठिकाणी एकच शिक्षक कार्यरत आहेत. 

या बाबत अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांनी सदर जागेवर तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू असे निवेदन दि.12 ऑगस्ट 2023 रोजी संघटनेने दिले होते. त्याची दखल घेवून, दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी किसान सभा व एसएफआयच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली होती.यावेळी लेखी आश्वासन देवूनही मागण्यांची पुर्तता न झाल्याने आजपासून संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते.

यावेळी झालेल्या बैठकीत आंबेगाव तालुक्यातील शून्य शिक्षकी शाळा येथे तालुक्यातील अतिरिक्त शिक्षक यांची दि.8 सप्टेंबर 2023 पर्यंत समायोजन पद्धतीने नेमणूक केली जाईल व दि.15 सप्टेंबर 2023 पर्यंत तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील एका शिक्षकांची नियुक्ती जास्त पटसंख्या असलेल्या शाळेवरती केली जाईल असे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले.

यावेळी मान्य झालेल्या मागण्या आंदोलनस्थळी येवून गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला वाळूंज यांनी आंदोलकांना सांगितल्या व संघटनेच्या नेतृत्वाकडे लेखी आश्वासन सुपूर्त केले. यावेळी घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, गटशिक्षण अधिकारी श्रीमती सविता माळी इ.उपस्थित होते.

या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष, डॉ.अमोल वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे, जिल्हा सहसचिव अशोक पेकारी, तालुका सचिव रामदास लोहकरे, कृष्णा वडेकर, एस.एफ.आय.चे तालुका सचिव समीर गारे, योगेश हिले, रोशन पेकारी, विठ्ठल असवले, कावजी तिटकारे, मच्छिंद्र वाघमारे, शंकर केंगले, बाळू कोंढवळे, संतोष असवले अशोक जोशी इ.नी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय