Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआम्ही बाबरी पाडू शकतो; तर पुण्येश्वरावळील बेकायदा मस्जिद पाडूच शकतो – आमदार...

आम्ही बाबरी पाडू शकतो; तर पुण्येश्वरावळील बेकायदा मस्जिद पाडूच शकतो – आमदार महेश लांडगे

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : आम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे अनुयायी आहोत. आम्ही अयोध्येतील बाबरी मशीद पाडू शकतो. तर पुण्येश्वारला अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी तिथे उभारलेली अनधिकृत मशीद पाडूच शकतो, अशी भीमगर्जना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. 

पुणे हे शहराचे नाव ज्यावरून पडले ते पुण्येश्वर मंदिर आणि या मंदिराच्या जागेवरील बेकायदा मस्जिद हटवण्यासाठी सकल हिंदू समाज बांधव आणि विविध संघटनांच्या वतीने पुणे महापालिका भवनासमोर आज तीव्र आंदोलन करण्यात आले. 

यावेळी भाजपाचे आमदार महेश लांडगे, नितेश राणे, पुणे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रखर हिंदूत्ववादी नेते डॉ. गजानन एकबोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

आमदार लांडगे म्हणाले की, पुण्यात श्री. पुण्येश्वर मंदिराजवळील अनधिकृत मस्जिदीचे बांधकाम ४८ तासांत हटवा… अन्यथा आम्ही हटवणार आहोत. पुणे शहराला ज्या मंदिराच्या नावावरुन ओळखले जाते. तो इतिहास कायम ठेवण्यासाठी आम्ही आता लढा सुरू केला आहे. पुण्येश्वराला अतिक्रमणातून मुक्त केले पाहिजे. न्यायालयाने या बांधकामाला स्थगिती दिली आहे. पण, प्रशासन कारवाई करीत नाही. प्रशासनाने जी मुळमुळीत भूमिका घेतली आहे.

कोण आला रे कोण आला

राज्याच्या विधानसभा सभागृहामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यासोबत आमदार महेश लांडगे यांची शब्दीक खडजंगी झाली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी लांडगे यांचा प्रखर हिंदूत्ववादी नेतो म्हणून समर्थन केले होते. आज झालेल्या आंदोलनात आमदार लांडगे यांनी भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामध्ये ‘‘कोण आला रे कोण आला… अबू आझमीचा बाप आला…’’ अशा प्रक्षोभक घोषणा देण्यात आल्या. आमदार लांडगे यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. पुण्याच्या कोंढवा, हडपसर भागात जर काही लोक घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील. तर आम्ही सुद्धा घरात घुसून मारल्याशिवाय गप्प बसणार नाही… अशा इशाराही आमदार लांडगे यांनी दिला. त्यामुळे पुण्यात हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय