Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कला क्रीडासंस्कार शिबीर सांगता सोहळा

PCMC : कला क्रीडासंस्कार शिबीर सांगता सोहळा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार संस्कृती समितीने १५ एप्रिल तें २५ एप्रिल विविध कला क्रीडा प्रकारांचे विद्यार्थी व महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण आयोजीत केलें होते, त्याच बरोबर मंचावर कधीच न गायलेले स्थानिक हौशी कलाकारांसाठी पिंपळे गुरव करावके गानरत्न २०२४ स्पर्धेचे आयोजन केले होते. pcmc news

शिबिरातील प्रशिक्षणार्थीना व गानरत्न विजेत्याना पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विजेते घोषित करण्यात आले अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शेळके यांनी दिली

प्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष शाम जगताप, राज्य शासन पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र तथा बांधकाम व्यावसायिक अरुण पवार, उपाध्यक्ष तानाजी जवळकर, चिंचवड उपाध्यक्ष प्रदिप गायकवाड उदय ववले, सामाजिक न्याय अध्यक्ष बाळासाहेब पिलेवार, संदिप राठोड आदि उपस्थित होते. इना फ्रान्सिस यांच्या नटराज वंदन नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

आदिम महिला सरचिटणीस सुनिता कोळप यांनी प्रशिक्षण शिबिरामध्ये चित्रकला, सुलेखन, मोडी लिपी, नृत्य, रांगोळी, मेहंदी, वारली चित्रकला आणि योगा, कराटे, लाठी काठी, लंगडी, कबड्डी, खोखो या क्रीडा प्रकारांचे २५० हून अधिक प्रशिक्षणार्थिनी सहभाग घेतला होता असे प्रतिपादन केले. pcmc news

नामवंत अनुभवी तज्ञ प्रशिक्षकांनी यासाठी मार्गदर्शन केले यामध्ये चक्रधर साखरे, कांचन महाजन, अलसबा शेख, वंदना डोंगरे विजया नागटिळक, अमरजीत कौर, कमलेश शिंदे प्रशांत सांबरे, यांनी विविध कलांचे तर दिपाली झंवर, रुद्र जाधव, मनीष यादव, संतोष बुटानाळ निरज खरात यांनी क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले.

मंचावर लाठी काठी आणि कराटे याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. गानरत्न स्पर्धेत शालेय गटात गायत्री बेन्नरू, महाविद्यालयीन गटात अवनी राणे व प्रौढ स्त्री पुरुष गटात चेतना मिसाळ, रश्मी बहेकर, गजानन गरुड अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक संपादन केले. शिवसह्याद्री ढोलताशा पथकाची विशेष कामगिरी म्हणून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली झंवर यांनी अहवाल वाचन ममता यादव, प्रमाणपत्र यादी वाचन, सामाजिक संस्था संघटना यादी वाचन पूनम अगवाने, माधवी मुळुक आभार प्रदर्शन सुशिला डिसूझा यांनी तर कार्यक्रमाचे नेटके आणि सूत्रसंचलन वैशाली लेणे यांनी केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त

SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !

मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा

संबंधित लेख

लोकप्रिय