Sunday, May 19, 2024
Homeजिल्हासप्तशृंगी गड घाटात एसटी बस ४०० फूट दरीत कोसळूली, १५ ते २०...

सप्तशृंगी गड घाटात एसटी बस ४०० फूट दरीत कोसळूली, १५ ते २० प्रवासी जखमी

नाशिक : वणीच्या सप्तशृंगी गड घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस ४०० फूट दरीत कोसळून हा अपघात झाला. यात एका महिलेच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्तश्रृंगीगड घाटात गणपती टप्प्यावरून बस घाटात कोसळली. गडावरून मुक्कामी असलेल्या खामगाव डेपो एस.टी.बस घाट उतरतं असताना सकाळी ७ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात अंदाजे १५ ते २० प्रवासी जखमी झाले आहेत, तर एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना झाली होती. बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती.

या अपघातानंतर गडावरील ग्रामस्थांकडून मदत कार्य सुरू असून शासकीय यंत्रणा देखील गडावर पोहचली आहे. सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत.

हे ही वाचा :

‘एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता होणार…’ विधान विधानसभेच्या उपाध्‍यक्षचं वक्तव्य

मोठी बातमी : १२ आमदारांसदर्भात सर्वोच्च न्यायालाचा मोठा निर्णय

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय