भावनगर : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणार्या मुसळधार पावसामुळे बलसाड, जुनागड, भावनगर, नवसारी, देवभूमी द्वारका ई.महत्वाच्या शहरातील रस्ते जलमय झाले आहेत.
दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पूरामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. पूराचे पाणी गावांमध्ये शिरल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि पूरामुळे संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस आणि पूर यामुळे आतापर्यंत १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे ४११९ जनावरे दगावली आहेत.
पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफकडून (NDRF) बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अशामध्ये आता गुजरातमध्ये पुढच्या २४ तासांमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हे ही वाचा :
धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले
पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या
धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व
विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !
विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्या दुर्घघटनांना मानवी हस्तक्षेपही कारणीभूत
सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !