Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाशासनाचा आदेश भंग करत खोकेधारकांवरील अतिक्रमण मोहीम तात्काळ बंद करावी; अन्यथा...

शासनाचा आदेश भंग करत खोकेधारकांवरील अतिक्रमण मोहीम तात्काळ बंद करावी; अन्यथा…

सोलापूर : नुकतेच सोलापूर शहराचे नाव देशात राबवत असलेल्या स्मार्टसिटीत उत्तम कामगिरी व प्रगती केल्याची दखल केंद्र सरकारकडून घेण्यात आली. परंतु या शहरात लाखोंच्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांना अद्यापही रोजगार देऊ न शकणारे शासन स्वयंरोजगार करणाऱ्या चारचाकी, खोकेधारक, फेरीवाले, लहान व्यासायिक रस्त्याच्या कडेला बसून आपले उदरनिर्वाह करत आहेत. अशांवर अतिक्रमणाचा बडगा उचलत त्यांना बेदखल करण्याचा डाव महापालिकेने चालविला आहे. या चारचाकी फेरीवाले व लहान व्यावसायिकांना विस्थापित होऊ देणार नाही. यांच्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेकडे सादर झालेले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि हे जुलमी अतिक्रमण रोखण्यात यावे अन्यथा महापालिकेवर आक्रमक आंदोलन करण्याचा पवित्रा युनियनच्या माध्यमातून होईल असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी पालिकेत आयुक्तांच्या बैठकीत घोषणा केली. Violating the order of the government, the encroachment campaign against box holders should be stopped immediately

स्वयंरोजगार करण्यासाठी रस्त्याच्या कडेला व लहान व्यवसाय, चारचाकी फेरीवाले, किरकोळ फळ भाजी विक्रेते यांचे पुर्नवसन होण्याकरिता केंद्र व राज्य सरकार फेरीवाला धोरण कायदा २००९ व तसेच चॅलेंज फंड अंतर्गत २०१३ मध्ये सर्व्हे करून त्याचे सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यात आले व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सन २००९ साली इनडेव्हलपड कंपनी व २०१३ सातारा निमशासकीय संस्था, तसेच २०१८ साली उस्मानाबाद च्या ओएसीस या निमशासकीय संस्थेकडून लहान व्यवसाय व रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणारे चारचाकी फेरीवाले यांच्याबाबत सर्व्हेक्षण करून अहवाल तयार करण्यात आला. 

याबाबत २८ डिसेंबर २०२१ रोजी तत्कालीन आयुक्त पी.शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर फेरीवाला समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उस्मानाबाद च्या ओएसीस या निमशासकीय संस्थेकडून करण्यात आलेल्या अहवालानुसार ६००० फेरीवाल्यांचे ऑनलाइन सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्याची यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार त्यास तत्वतः मंजुरी देऊन महापालिका मार्फत हॉकर्स झोनची निर्मिती करण्यासाठी निवड प्रक्रिया करण्यात यावी. हि आग्रही मागणी युनियनची असून त्याची अंमलबजावणी अद्यापही होत नाही म्हणून जोपर्यंत सोलापूर महानगरपालिका मार्फत शासनाच्या आदेशाचे पालन व अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत चारचाकी फेरीवाले, रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण थांबविण्यात यावे. हि प्रमुख मागणी घेऊन शुक्रवार दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी ज्येष्ठनेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली यांना लाल बावटा फेरीवाले, चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना मार्फत शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. 

या शिष्टमंडळात युनियनचे अध्यक्ष माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी, उपाध्यक्ष खाजाभाई करजगी, सचिव युसुफ शेख (मेजर), शहाबुद्दीन शेख, मजीद बागवान, हिजबर पठाण, सुहास सूर्यवंशी, इरफान अरब, इरफान शेख, सोनवणे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय