लातूर : राज्यातील अनेक भागांत मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ सुरू केला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर व धाराशिव जिल्ह्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. लातूरला दोन तास गारपीट झाली. त्यात दोन ठिकाणी वीज कोसळून २१ वर्षीय तरुणासह ६५ वर्षीय वृद्धा ठार झाली.Hailstorm
लातूर जिल्ह्यात चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रबी हंगामातील पिकांची काढणी झाल्याने धोका टळला असला तरी आंबा फळपिकासह भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. वीज कोसळून दोन व्यक्ती आणि 13 जनावरे दगावली आहेत. चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने सार्थक संतोष ढोले (वय 21) हा युवक जखमी झाला होता. उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. Hailstorm
महिन्याभरात तीन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने निसर्गाच्या लहरीपणाचा सामना लातूरकरांना करावा लागत आहे. नांदेड, हिंगोली, जालना आणि बीड जिल्ह्यातही अवकाळी पाऊस कोसळला. संभाजीनगरमध्ये शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. शहराच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले. वीजवाहिन्या तुटल्या. शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. सायंकाळी अर्ध्या तासात १६.३ मिलिमीटर पाऊस पडला.
धाराशिव जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी लागली. तुळजापुरात झालेल्या धो-धो पावसामुळे बाहेरील पाणी मंदिराच्या परिसरात शिरले होते. उमरगा तालुक्यातील मुरुम येथे वीज पडल्यामुळे सात शेळ्या ठार झाल्या, तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच याच तालुक्यातील तलमोड, तुरोरी, तुगाव येथे वीज पडून तीन पशुधन दगावले आहे.
हे ही वाचा :
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…
ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !
अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला
मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी