Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : स्वार्थासाठी गद्दारी करणा-यांना धडा शिकवणारी निवडणूक - चेतन पवार‌

PCMC : स्वार्थासाठी गद्दारी करणा-यांना धडा शिकवणारी निवडणूक – चेतन पवार‌

संजोग वाघेरेंच्या प्राचाचार्थ युवासेनेचे सैनिक मैदानात PCMC

पिंपरी चिंचवड : स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गद्दारी करणाऱ्यांच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिकांची, तसेच अशा गद्दारांना धडा शिकवणारी ही लोकसभा निवडणूक आहे. त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval loksabha 2024) सर्वांपर्यंत मशाल पोहोचवा, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेना शहरप्रमुख चेतन (अण्णा) पवार यांनी युवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. pcmc news

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील पक्ष कार्यालयात आयोजित युवासेनेच्या आढावा बैठकीत चेतन पवार बोलत होते. शिवसेना (Shivsena) (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना उपशहर प्रमुख भाऊसाहेब जाधव, विनायक दळवी, निखील दळवी, सुमित निकाळजे, रोहन वाघेरे, गणेश जोशी, पिंपरी विधानसभा युवाप्रमुख शुभम मुळे, चिंचवड विधानसभा प्रमुख विशाल नाचपल्ले, पिंपरी विधानसभा मीडिया प्रमुख अदिराज कमोट पदाधिकारी, युवा सैनिक या वेळी उपस्थित होते. pcmc news

चेतन पवार पुढे म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे‌‌ यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न होत होत होते. तळेगावला उद्योग आल्यामुळे रोजगार निर्मिती होणार होती. परंतु गद्दारांमुळे आलेल्या सरकारने आणि त्यांच्या महाशक्तीने युवकांचे रोजगार पळवले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे देखील यामुळे नुकसान झाले. वाढती बेरोजगारी, वाढती महागाई हे मुद्दे घेऊन युवासेना लोकांपर्यंत जात आहे. लोकांमध्ये असंतोष असून तेच गद्दारांना धडा शिकविणार आहेत.

मशाल सर्वांपर्यंत पोहचवू अन् त्यांचा डाव हाणून पाडू”

मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठविण्याचा मानस केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे‌ शिलेदार आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात जनजागृती करून मतांची टक्केवारी वाढवावी लागेल. मात्र, चिन्हावरून दिशाभूल करुन मते मिळविण्याचा डाव विरोधकांचा दिसतो आहे. तो आपण मतदारसंघात घरा घरात उद्धव ठाकरे साहेबांचा संदेश आणि “मशाल” चिन्ह पोहचवून हाणून पाडू, असेही चेतन पवार यांनी म्हटले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय