Monday, May 6, 2024
HomeराजकारणElection : नागालँडच्या 6 जिल्ह्यांमध्ये २० आमदारांसह 0% मतदानाचं कारण तरी...

Election : नागालँडच्या 6 जिल्ह्यांमध्ये २० आमदारांसह 0% मतदानाचं कारण तरी काय?

Lok Sabha Election 2024 कोहिमा :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी मतदान झालं. या कालावधीत विविध राज्यातील 102 जागांवर मतदान झालं. दरम्यान, नागालँडच्या पूर्वेकडील सहा जिल्ह्यांमध्ये एकही मतदान झालं नाही. येथील मतदान कर्मचारी नऊ तास मतदान बूथवर मतदारांची वाट पाहात होते. परंतु एकही मतदार मतदान करण्यासाठी बुथवर फिरकला नाही. फ्रंटियर नागालँड टेरिटरी (एफएनटी) च्या मागणीसाठी ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन संघटनेनं पुकारलेल्या संपानंतर या भागातील चार लाख मतदारांपैकी एकानंही मतदान केलं नाही.Election

6 जिल्ह्यांमध्ये 0 मतदान :

नागालँडचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आवा लोरिंग यांनी सांगितलं की, 20 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या प्रदेशातील 738 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी नऊ तासांत कोणीही मतदानासाठी आलं नाही. एवढंच नाही, तर 20 आमदारांनीही मतदानाचा हक्क बजावला नाही. नागालँडमधील 13.25 लाख मतदारांपैकी पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये 4 लाख 632 मतदार आहेत.Election

20 आमदारांनी केलं नाही मतदान



राज्याच्या राजधानीपासून सुमारे 41 किमी अंतरावर असलेल्या तौफेमा येथील त्यांच्या गावात मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नागालॅंडचे मुख्यमंत्री नेफिउ रिओ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एफएनटीच्या कामकाजाचा मसुदा स्वीकारला आहे. प्रदेशातील निवडून आलेले आमदार, प्रस्तावित FNT च्या सदस्यांमध्ये सत्तेतील वाटा वगळता सर्व काही ठीक आहे, असं दिसतं. ENPO सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या वेगळ्या राज्याची मागणी करत आहे. कोणत्याच सरकारांनी या प्रदेशात सामाजिक-आर्थिक विकास केला नाही, असा त्यांचा आरोप आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, राज्य सरकारनं आधीच स्वायत्त संस्थेची शिफारस केली आहे. जेणेकरून या प्रदेशाला उर्वरित राज्याच्या बरोबरीनं पुरेसं आर्थिक पॅकेज मिळू शकेल. Election

मतदान न केल्याबद्दल पूर्व नागालँडमधील 20 आमदारांवर कारवाई केली जाईल का, असं विचारलं असता ते म्हणाले, “आम्हाला संघर्ष नको आहे. बघूया काय होईल ते.”ईएनपीओला कारणं दाखवा नोटीस :नागालँडमध्ये लोकसभा निवडणुका सुरू होण्याच्या काही तास आधी, ENPO नं गुरुवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून राज्याच्या पूर्व भागात अनिश्चित काळासाठी पूर्ण बंद पुकारला होता. एखादी व्यक्ती मतदानासाठी गेल्यास कायदा, सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित मतदारावर राहील, असंही संस्थेनं कळवलं होतं. नागालँडचे सीईओ वायसन आर यांनी गुरुवारी रात्री ईएनपीओला यासंदर्भात कारणं दाखवा नोटीस बजावली आहे

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय