Friday, May 17, 2024
Homeलोकसभा २०२४Amol kolhe : आढळरावांनी आपला पराभव मान्य केलाय - खा. डॉ. अमोल...

Amol kolhe : आढळरावांनी आपला पराभव मान्य केलाय – खा. डॉ. अमोल कोल्हे

आंबेगाव : केंद्रातील सत्ता ही बदलत आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येत असल्याने केंद्रात सत्तेतील खासदार निवडून द्या हे विधान करून आढळराव यांनी आपला पराभव मान्य केला असल्याचा टोला खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला. shirur news

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, सुरेश भोर, दिलीप पवळे, सुनील तोत्रे, मनीषा तोत्रे, निलेश वळसे, पुजा वळसे, विजय शेटे आदी उपस्थित होते. (Amol kolhe)

२०२४ ची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, या निवडणुक प्रचारात धोरणात्मक मुद्दांवर बोललं जाईल ही अपेक्षा होती. मात्र, खोट बोल पण रेटून बोल यासवयीबरोबरच पंधरा वर्षांच्या अपयशाची पोटदुखी होत असल्याने वैयक्तिक टिका केली जात असल्याचं प्रतिउत्तर डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिले.

डॉ. कोल्हे यांच्यावर आढळराव पाटलांकडुन सातत्याने वैयक्तिक टिका केली जातीये. त्यावर प्रतिउत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले की, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत धोरणात्मक बाबींवर बोलावं, पण त्यांच्याकडे वेगळे मुद्देच नाहीत. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे तीच तीच वाक्य फिरवून ते बोलतायत. पंधरा वर्षातल त्यांचं अपयश आहे. पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पोराने काम मार्गी लावली त्याची ही पोटदुखी आहे, असा टोला ही डॉ. कोल्हे यांनी लगावला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय