Sunday, December 8, 2024
Homeराज्यराज्यात काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

Weather Updates : दिवाळीचा सण आनंदात पार पडल्यानंतरही नोव्हेंबरमध्ये अजूनही राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत असून हिवाळ्याची चाहूल लागल्याचे संकेत मिळत आहेत. हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. विशेषत: पुणे, नाशिक, आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात हिवाळ्याची चाहूल लागली असून कमाल तापमान 33 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सियसच्या आसपास पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत थंडीचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Weather Updates

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय