Friday, May 3, 2024
HomeNewsइंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू तर अनेक...

इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरहून (Madhya Pradesh Bus Accident) जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने कठडा तोडून बस नर्मदा नदीत कोसळली. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे.

इंदूरहून अमळनेरकडे (MH40 N9848) या क्रमांकाची महाराष्ट्र एसटी मंडळाची बस सकाळी ७.३० वाजता निघाली होती. खलघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप १२ ते १५ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे.

दरम्यान, एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेची दखल घेतली असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. सीएम याबाबात अधिक माहिती घेत आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली.

हेही वाचा

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय