Friday, May 17, 2024
Homeजिल्हाबीड : SFI - DYFI चे जिल्हास्तरीय अभ्यास शिबिर संपन्न !

बीड : SFI – DYFI चे जिल्हास्तरीय अभ्यास शिबिर संपन्न !

बीड : रविवारी दिनांक १७ जुलै २०२२ रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) यांचे संयुक्त जिल्हास्तरीय अभ्यास शिबिर माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे संपन्न झाले.

या शिबिरात जिल्हाभरातून आलेल्या विद्यार्थी आणि तरुण प्रतिनिधींना प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ तथा ज्येष्ठ पुरोगामी-डावे-मार्क्सवादी विचारवंत प्रा. अजित अभ्यंकर, डीवायएफआयचे राज्य सरचिटणीस बालाजी कलेटवाड, माजी राज्य उपाध्यक्ष ऍड. अजय बुरांडे, एसएफआयचे राज्य सरचिटणीस रोहिदास जाधव यांनी मार्गदर्शन केले.

डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष मोहन जाधव हे शिबिराच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन केले. शिबिराचे प्रास्ताविक डीवायएफआयचे जिल्हा सचिव प्रा. विशाल देशमुख यांनी केले, आभार प्रदर्शन एसएफआयचे जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा सचिव लहू खारगे यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय