नवी दिल्ली : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने जनता अगोदरच त्रस्त असताना या महागाईच्या झळा नागरिकांना आणखी बसणार आहे. जीएसटीच्या कक्षेत नसलेल्याही वस्तू आता जीएसटीमध्ये आणल्या आहेत त्यामुळे मोदी सरकारने सामान्यांना एक प्रकारे मोठा दणकाच दिला असून हा जीएसटी सामान्य नागरिकांना रडवणार आहे.
गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST कौन्सिलने अनेक वस्तूवरील जीएसटी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून (१८ जुलै) अनेक खाद्यपदार्थ महाग होणार (packed and label products costlier) आहेत. यामध्ये मैदा, पनीर, दही महाग होणार आहे. ब्रँड नसलेले प्री-पॅकेज केलेले आणि डाळींवरही ५ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. टेट्रा पॅकवर १८ टक्के जीएसटी आणि बँकेद्वारे धनादेश जारी करण्यासह नकाशे आणि चार्टवर १२ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
गहू आणि इतर अन्नधान्य आणि तांदूळ यावर ५% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयात उपचार घेणे महागणार आहे. यापुढे रुग्णालयाने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खोली उपलब्ध करून दिल्यास त्या खोलीवर ५ टक्के दराने जीएसटी द्यावा लागेल. यापूर्वी, १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या हॉटेलच्या खोल्यांवर जीएसटी नव्हता, आता यावर १२ टक्के जीएसटी असणार आहे.
ब्लेड, कात्री, पेन्सिल शार्पनर, नकाशे, काटे चमचे, स्किमर, एलईडी दिवे, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादनांवर १८ टक्के जीएसटी करण्यात आला आहेत. तर यापूर्वी पाच टक्के कर असलेल्या सोलर वॉटर हीटर्सवर आता १२ टक्के जीएसटी लागणार आहे. गोदामात ड्रायफ्रूट्स, मसाले, गूळ, कापूस, चहा, कॉफी इत्यादी ठेवणेही महाग होणार आहेत. त्यांच्यावर १२ टक्के दराने जीएसटी आकारला जाईल. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि स्मशानभूमीच्या कामाच्या कंत्राटांवर आता १८ टक्के जीएसटी लागू होणार आहे.
इतर वस्तूवरील जीएसटी वाढवला असला तरी काही उत्पादनांवरील जीएसटी घटवला आहे. रोपवे आणि काही सर्जिकल उपकरणांद्वारे माल आणि प्रवाशांच्या वाहतुकीवर १२ टक्के असणाऱ्या करात घट करून तो पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
हेही वाचा
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी
MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी