Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणमहाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनातर्फे 'गुणवंत शिक्षक पुरस्कार' देऊन शिक्षकांचा गौरव

महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनातर्फे ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन शिक्षकांचा गौरव

spot_imgspot_imgspot_imgspot_img

कळवण (सुशिल कुवर ) : महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना शाखा सुरगाणा यांच्या मार्फत दिला जाणारा तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आज सुरगाणा तालुक्यातील शिक्षकांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा नूतन विद्यामंदिर सुरगाणा येथे आयोजित केला होता.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण- सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार जिवा पांडू गावित उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सुरगाणा पंचायत समितीचे सभापती इंद्रजित गावित होते.

यावेळी सुरगाणा तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच डोल्हारे केंद्राचे केंद्र प्रमुख राजेंद्र बागुल, आंबाठा बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक तसेच गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी यांचाही संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या शिक्षकांचा झाला सन्मान

सतिश इंगळे, सुलोचना बोरसे, हिरामण गायकवाड, संजय बागुल, केशव भोये, यशवंत बागुल, विठ्ठल साबळे, रामदास भोये, विठ्ठल पाडवी, राजकुमार चौधरी, मोहन राठोड, विष्णू इंगोले, अभिजित घुले, सुभाष खंबाईत, पुंडलिक चौधरी, लक्ष्मण बागुल, लक्ष्मण ठाकरे, दिगंबर चौधरी, परशराम गावित, भास्कर झिरवाळ, लक्ष्मण चौधरी, मधुकर गायकवाड, झांबरु जोपळे या गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

सुरगाण्यातील नूतन विद्यामंदिर यथे झालेल्या कार्यक्रमात जि. प. सदस्या ज्योती जाधव, पंचायत समितीचे सदस्य एन. डी गावित, गटविकास अधिकारी दीपक पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक, केंद्रप्रमुख राजेंद्र बागुल, महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना राज्यध्यक्ष भागवत धूम, जिल्हा अध्यक्ष मोतीराम भोये, तालुका अध्यक्ष भागवत चौधरी, सरचिटणीस तुकाराम अलबाड व सर्व राज्य जिल्हा तालुका कार्यकारणी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय