Tuesday, May 7, 2024
HomeराजकारणNashik : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा

Nashik : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा

Nashik : आज दिनांक २६ एप्रिल रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी व महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला. (Nashik)

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास व इंडिया आघाडीची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना देण्यात आलेली आहे. आरएसएस प्रणित भारतीय जनता पार्टीच्या वाढत्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल करून टाकणाऱ्या सरकारच्या विरोधात देशातील प्रागतिक पक्षांनी एकत्र येऊन तयार झालेल्या इंडिया आघाडीचा घटक पक्षांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा समावेश आहे. देशभर इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाकप प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरलेला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या वतीने आज वाजे यांना पाठिंबा देण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व त्याच्या सर्व जनसंघटना हे वाजे यांच्या विजयासाठी प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी राहतील असे आश्वासन देखील पदाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी भाकपचे राज्य सहसचिव कॉ राजू देसले, जिल्हा सचिव कॉ महादेव खुडे, शहर सचिव कॉ तल्हा शेख, कॉ पद्माकर इंगळे, राज्य कौन्सिल सदस्य भास्करराव शिंदे, कॉ विराज देवांग, कॉ प्राजक्ता कापडणे, कॉ रामदास भोंग, कॉ मनोहर पगारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय