Friday, April 26, 2024
Homeजिल्हाआदिवासी तरूण, आदिवासी समाजाची फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा – डॉ. भारत...

आदिवासी तरूण, आदिवासी समाजाची फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा – डॉ. भारत पाटणकर

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : पालघर जिल्हयातील रामपूर खेडपाडा व सध्या पुणे येथे वास्तव्यास असणारा अमृत पडवळे या तरूणाच्या नावे एक कोटीचे बनावट कर्ज काढून आदिवासी तरूणाला फसवण्याचा तसेच आदिवासी समाजाची जमीन बेकायदेशीरपणे खरेदी करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई आठ दिवसांत करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.

अमृत केशव पडवळे हा आदिवासी तरूण ऑर्चिड स्कुल बाणेर येथे नोकरीस होता. संबंधितांनी अमृत पडवळे यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची व आदिवासी समाजाची फसवणुक केली आहे. नोकरीला लावतो, महिना २५ हजार देतो असे अमिष दाखवून अमृत पडवळे यांच्या नावावर ठाणे जिल्ह्यातील व परिसरातील आदिवासी समाजाची जमीन खरेदीखत करून घेतली. तसेच त्यानंतर त्याच्या परस्पर अमृतच्या नावे जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी सोलापूर येथील बँकेतून बनावट कागदपत्रे व सहया वापरून रू. १,१०,००,०००/- (रूपये एक कोटी दहा लाख) चे कर्ज काढले व ते परस्पर अमर जाधव व यशवंत पाटील यांनी स्वत:कडे घेतले. अशा प्रकारे एका मागासवर्गीय आदिवासी तरूणाला जाळ्यात अडकवून त्याच्यामागे अनेक गैरप्रकार करण्याचा प्रयत्न सदर लोकांनी केला आहे. आदिवासी समाजाची जमीन खरेदी करता येत नसल्याने या तरूणाला अमिष दाखवुन फसवणूक करण्यात आली आहे.

सदर प्रकार लक्षात येताच अमृत पडवळे यांनी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. परंतु गुन्हा दाखल होऊनही इतक्या दिवसात आरोपींना अटकही केली नाही त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने करण्यात येत आहे. सदर झालेल्या आदिवासी तरूणाच्या फसवणुकीचे व अन्यायाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

नागपूरचे ‘एम्स’ एनएबीएचची मान्यताप्राप्त देशातील पहिले रुग्णालय

जगातील सर्वाधिक 9 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर, कोण आहेत पहा !

आरक्षित नोकर भरतीबाबत राज्य सरकार घेणार “हा” मोठा निर्णय

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय