Wednesday, May 1, 2024
Homeजिल्हा'स्वाधार'ला ६० कोटींचा निधी मिळाला, लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार इतकी रक्कम..

‘स्वाधार’ला ६० कोटींचा निधी मिळाला, लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार इतकी रक्कम..

पुणे : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी तब्बल ६० कोटींचा निधी शनिवारी मिळाला आहे. मागील वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्याची प्रतीक्षा होती असा समाज कल्याण विभागामार्फत येणारा स्वाधार निधी लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.

स्वाधार योजनेच्या अटी व नियमांमध्ये बदल होऊन सुधारणा होण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना व सामाजिक संघटना यांच्याकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार समिती गठित करण्यात आली होती. राज्यातील विविध विद्यार्थी संघटना यांच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांच्या समवेत चर्चा व बैठक करून याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला.

स्वाधार योजनेच्या अटी, शर्ती व त्या अनुषंगाने काही बदल येणाऱ्या काळात होणार आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुलभता निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अधिक गतिमान पद्धतीने व वेळेत देणे सोयीचे होणार आहे. त्या अनुषंगाने लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये नियमानुसार योग्य ती रक्कम त्यांना दिली जाईल.

हे ही वाचा :

अकोल्यात 2 गटात हिंसक हाणामारी, कलम 144 लागू

ज्यांनी द्वेष पसरवणाऱ्या ढोंगी, नग्न सम्राटाला सत्तेपासून दूर केलं.’ – प्रसिध्द अभिनेत्याची टीका

स्कॅन करा तिकीट काढा, आता एसटी बस होणार कॅशलेस !

ब्रेकिंग : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची कुस्ती महासंघ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी !

कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’

“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय